मुंबई : बॉलीवुड अभिनेता अनुपम खेर यांना मुंबईत राहून ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या क्षणी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. त्याने वेगळ्या अंदाजात आठवणी शेअर केल्या आहेत. मुंबई लोकलमधून ३७ वर्षांपूर्वी या मायानगरीत त्यांनी प्रवेश केला होता. अनुपमने सोशल मीडियावर सीएसटीम स्थानकाचा एक व्हिडओ शेअर केलाय. भारतीय रेल्वे प्रवासाशी जोडलेली आठवण त्यांनी शेअर केली. 


बॉलीवुडमध्ये ३४ वर्षे  



आजच्या दिवशी ३७ वर्षांपूर्वी म्हणजेच ३ जून १९८१ ला पंजाब मेलमधून मुंबईच्या सीएसटीएम स्थानकावर ते उतरले होते. ते क्षण पुन्हा जगण्यासाठी त्यांनी ही आठवण शेअर केली. बॉलीवुडमध्ये येऊन त्यांना ३४ वर्षे पूर्ण झाली. यावेळी त्यांना सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले.