आर माधवनचा `हा` सिनेमा पाहून या दिग्गज अभिनेत्याचे अश्रु अनावर...
मध्यंतरी बॉलीवूडचा फारच वाईट काळ सुरू होता त्यामुळे सगळीकडेच वादळी वातावरण होते.
मुंबईः सध्या सर्वत्र चर्चा आहे ती रॉकेट्री या चित्रपटाची. त्यातून मोठमोठ्या अभिनेत्री आणि अभिनेते सध्या या चित्रपटाच्या प्रेमात आहेत त्यामूळे त्यांना आता बॉलीवूडला चांगले दिवस आले असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. मध्यंतरी बॉलीवूडचा फारच वाईट काळ सुरू होता त्यामुळे सगळीकडेच वादळी वातावरण होते.
परंतु आता मात्र हे चित्र भुलभुलैया २ आणि रॉकेट्री या चित्रपटांमुळे बदलले असे म्हणायला काही हरकत नाही. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला केला. त्यातून असे अनेक चित्रपट पुढेही येतील अशी आता बॉलीवूडला आशा आहे. त्यामुळे सध्यातरी हे बदलणारे चित्र फार आशादायी आहे, असे बॉलीवूडमधील लोकांचे मतं आहे.
आर माधवनचा 'रॉकेटरी: द नंबी एफेस्ट' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाई करू शकणार नाही पण या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श केला आहे. या चित्रपटात आर माधवन मुख्य भूमिकेत असून त्याने या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण केले आहे.
देशाचे महान शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर बनलेला हा चित्रपट ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही पाहिला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनुपम खेर इतके भावूक झाले की ते रडले. त्यांनी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. ज्यात अनुमप खेर म्हणाले आहेत की प्रत्येक भारतीयांनी केवळ हा चित्रपट पाहूच नये तर त्यांनी देशाचे शास्त्रज्ञ नांबी यांची माफीही मागावी.
अनुपम खेर यांनीही त्यांच्या ट्विट आणि व्हिडिओमध्ये आर माधवनचे कौतुक केले आहे. इस्रोचे रॉकेट वैज्ञानिक नंबी नारायणन यांना 1994 मध्ये हेरगिरीचा खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत अनुपम खेर यांनी लिहिले, 'नाम्बी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आर माधवनचा रॉकेट्री चित्रपट पाहिला. जबरदस्त! ही एक भावनिक प्रेरणादायी कथा आहे. मी मनापासून रडलो. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहावा आणि नंबी नारायणन सरांची माफी मागावी. अशा प्रकारे आपण इतिहासाच्या चुका सुधारू शकतो.
याबद्दल बोलताना आर माधवनही अनुपम खेर यांच्या ट्विटचे कौतुक करून त्यांचे आभार मानले आहेत.