Anupam Kher Mumbai Office Robbed : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांच्या मुंबईतील ऑफिसमध्ये चोरी झाली आहे. चोरांनी चार लाख रुपयांची चोरी केली आहे. इतकंच नाही तर सगळा सामान घेऊन ते रिक्षानं लंपास झाले आहेत. अनुपम खेर यांनी स्वत: या घटनेची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे. त्यांनी स्वत: पोलिसांना या विषयी माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरीची घटना ही 19 जून रोजी घडली होती. सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोर सामान घेऊन पळून जाताना दिसत आहे. अनुपम खेर यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की चोर त्यांच्या ऑफिसमध्ये कसे घुसले आणि काय सामान चोरी करून गेले. व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या ऑफिसची अवस्था कशी झाली ते देखील दाखवलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अनुपम खेर यांनी सांगितलं की 19 जून रोजी दोन चोरांनी त्यांच्या वीरा देसाई रोड येथे असलेल्या ऑफिसचा दरवाजा तोडला आणि सगळी तोडफोड करत ते आत घुसले. त्यानंतर त्यांनी जवळपास 4.15 लाख रुपयांचा सामाना चोरला आहे. व्हिडीओला शेअर करत अनुपम यांनी कॅप्शन दिलं की 'काल रात्री माझ्या वीरा देसाई रोड येथे असलेल्या ऑफिसचे दोन  दरवाजे तोडले आणि अकाऊंट्स डिपार्टमेंटमधून संपूर्म सेफ ज्याची शक्यता अशी आहे की ते तोडू शकले नसतील आणि आमच्या कंपनीकडून निर्मिती असलेल्या एका चित्रपटाचे निगेटिव्ह्स जे एका बॉक्समध्ये होते ते चोरून घेऊन गेले. आमच्या ऑफिसनं FIR केली आहे, आणि पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की लवकरच ते चोरांना अटक करतील, कारण CCTV कॅमेऱ्यात दोघं सामान घेऊन रिक्षात बसताना दिसले. देव त्यांना सद्बुद्धी देओ. हा व्हिडीओ माझ्या ऑफिसच्या लोकांनी पोलिस येण्याच्या आधी शूट केला होता.'


हेही वाचा : नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच सोनाक्षीच्या होणाऱ्या सासरी पोहोचले शत्रुघ्न सिन्हा आणि...!


दरम्यान, एका पोलिस अधिकाऱ्यानं ईटाइम्सला सांगितले की चोरांनी काही रक्कमेसोबत जवळपास 4.15 लाख रुपयांची चोरी केली आहे. अनुपम खेर यांनी देखील ईटाइम्सशी बोलताना सांगितलं की जी रील चोरांनी चोरली आहे, ती एका बॅगमध्ये होती. चोरांना वाटलं असेल की त्यात पैसै असतील. ते रील हे 'मैंने गांधी को क्यों मारा' या चित्रपटाचे होते. अनुपम खैर यांनी पुढे सांगितलं की ही एक जुनी बिल्डिंग आहे. ज्यात काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मला जी फुटेज मिळाली आहे, त्यात मी हे पाहू शकतो की दोन लोक आहेत. पोलिसांनी मला आश्वासन दिलं आहे की ते त्यांचा शोध घेतील.