मुंबई : पाकिस्तानी समर्थक आणि हॅकरमुळे अभिनेते अनुपम खेर यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टर्कीतील प्रो पाकिस्तानी हॅकर्सने अनुपम खेर यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती अनुपम खेर यांच्या मित्राने त्यांना दिली आहे. यानंतर ट्विटरनेदेखील त्यांचे अकाऊं ट सस्पेंड केले आहे.  


अनुपम खेर यांची माहिती  


सध्या अमेरिकेतील लॉस एन्जेलिस शहरात अनुपम खेर आहेत. त्यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, अनुपाम खेर यांच्या मित्राने अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली होती. त्यावेळेस अमेरिकेत एक वाजला होता. राज्यसभेचे खासदार स्वप्नव दासगुप्ता यांनी ट्विटर अकाऊंटवर केलेल्या मेसेजवर अनुपम खेर यांनी क्लिक केले आणि त्यानंतर अकाऊंट हॅक झाले. अनुपम खेर यांनी तात्काळ याबद्दल तक्रार नोंदावली आहे.  


 



 


ट्विटरकरांची माहिती  


अनुपम खेर यांचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर युजर्सनीदेखील याबाबतची माहिती दिली. अनुपम खेर यांचे अकाऊंट टर्कीतील जिहाद सायबर ग्रुपने हॅक केले आहे. 


सेलिब्रिटींना हा अनुभव अनेकदा आलाय 


अनुपम खेरप्रमाणेच ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि शाहीद कपूर यासारख्या  अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते.