मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरून (एनआरसी) देशभरात असंतोशातचे वातावरण आहे. आता या वादात ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी या वादात उडी घेतली. त्यांनी या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अनुपम खेर आणि बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांवर नासीर यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून निशाणा साधला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर नुकताच प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रत्त्युत्तर दिली आहे. 'अफाट प्रसिद्धी मिळाल्यानंतर देखील तुम्ही तुमचं जीनव कायम नैराश्यामध्ये घालवली आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या पदार्थांचं सेवन करत आहात त्यामुळे काय बरोबर आणि काय चूक यामधील अंतर तुम्हाला ठाऊक नाही.' असे खडेबोल अनुपम यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत नासीर यांना सुनावले आहेत. 



नसीरुद्दीन शहा यांनी एका वेबसाइटला मुलाखत दिली. त्यात सीएए व एनआरसीवर त्यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली. 'अनुपम खेर या मुद्द्यावर अधिक पुढाकार घेताना दिसत आहेत. पण त्यांना असं करण्याची काही गरज नाही. तो एक जोकर आहे.' नासीर यांनी खेर यांना जोकर म्हणत ते मनोरूग्ण असल्याचे देखील म्हटलं होतं. 


ते पुढे म्हणाले, 'अनेक दिग्दर्शक आणि कलाकारांनी या कायद्याविरूद्ध त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत पण कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकार यावर मौन बाळगून आहेत. आपण विरोध केल्यास आपल्याला बरचं काही गमवावं लागेल, अशी भीती कदाचित त्यांना वाटत असेल.' या सर्व मुद्द्यांना अधोरेखित करत त्यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोणची स्तुती केली.