मुंबई : सध्या सोशल मीडियावर बॉयकॉट हा ट्रेंड सुरु आहे. सगळ्यात आधी बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चा विरोध सुरु आहे. त्याचा या चित्रपटाला चांगलाच फटका बसला. त्यानंतर आता लगेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटाचा देखील विरोध होत आहे. हा बॉयकॉटचा ट्रेंड कुठे थांबत नाही असं पाहायला मिळतं. या सगळ्यात आता दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.


आणखी वाचा : पंढरपुरचा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी चक्क मराठीत दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पोस्ट Viral


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच त्या दोघांनी इंडिया टीव्ही आणि एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनुराग आणि तापसी यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘दोबारा’ला प्रेक्षकांनी बॉयकॉट करावं अशी विनंती केली आहे. त्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 'ज्याप्रमाणे आमिर आणि अक्षयसारख्या सुपरस्टार्सना बॉयकॉट करून लोकांनी डोक्यावर घेतलं आहे, त्याप्रमाणे आम्हालाही बॉयकॉट करून ट्रेंड होऊ द्या!' असं विचित्र वक्तव्य त्यांनी या मुलाखतीत केलं आहे.


आणखी वाचा : बिग बींच्या एका चुकीमुळे Ranbir-Alia चं करिअर धोक्यात? जाणून घ्या प्रकरण



आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर
हे पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना बॉयकॉट करायला सुरुवात केली आहे. पण खरंतर अनुराग आणि तापसी हे यावेळी मस्करी करत होते. यावेळी लगेच अनुरागनं त्याच्यावर लावण्यात आलेल्या Me Too आरोपांवरही वक्तव्य केलं. याव्यतिरिक्त त्या दोघांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टीं विषय खुलासा केला आहेत.