दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या बिग बींवर अनुराग नाराज
अनुरागने अमिताभ यांना टार्गेट केलं म्हटल्यावर नेटकरी कसले गप्प बसतात
नरेंद्र बंडबे, झी मीडिया, मुंबई : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना रविवारी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. सोशल मीडियावर बझ झाला. पण सिनीयर बच्चनना नेटकऱ्यांनी देशातल्या परिस्थितीवर शांत असल्याबद्दल घेरलंय. #whysilentsrbachchan हा हॅशटॅग सध्या ट्रेडींग आहे. हे सर्व सुरु झालं दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ट्विटनं. सहसा अमिताभ ट्विटर वॉरच्या भानगडीत पडत नाहीत. एंग्री यंग मॅन सध्या ७७ वर्षांचा झाला असला तरी ते गप्प बसले नाहीत. आता एंग्री ओल्डनं आपला ट्विटर बायो बदलला आणि अनुरागला उत्तर दिलं. त्यावरही नेटकरी तुटून पडलेत.
ज़्यादा परेशान होने की बात नहीं है , बस .... 19-20 ( उन्नीस बीस ) का ही फ़र्क़ है.... नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी केलेलं ट्विट इतकं वायरल होईल याचात्यांनी विचार केला नसेल... दिग्दर्शक अनुराग कश्यप तर त्यांच्यावर तुटून पडला. अनुराग बच्चन फॅन आहे हे लपलेलं नाही. पण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो असा हा महानायक देशातल्या परिस्थितीवर काहीही कसं बोलत नाही हे अनुरागनचं दु:ख आहे. त्यानं आपल्या रागाला ट्विटमार्फत मोकळं केलं. त्यानं अमिताभ यांच्या १९-२० या ट्विटला उत्तर दिलं.
अनुराग बिग बींच्या ट्विटरला रिप्लाय करत म्हणतो, 'इस बार फ़र्क़ उन्नीस बीस का नहीं है सर, इस बार फ़र्क़ बहुत बड़ा है । फ़िलहाल आप कृपया अपनी सेहत का ख़याल रखें ।अपने हिस्से का आपने ७० के दशक में ही कर दिया था , तबसे अपने अंदर का बच्चन हम अपने अंदर ले के घूम रहें हैं । इस बार सामने गब्बर हो या LION या फिर शाकाल ....हम भी देखेंगे
अनुरागनं अमिताभ यांना टार्गेट केलं म्हटल्यावर नेटकरी कसले गप्प बसतात. त्यांनी तर बहती गंगा में हात धुवून घेतले. #whysilentsrbachchan हा हॅशटॅग सुरु झाला. प्रत्येकानं आपआपल्या महानायकाला टार्गेट केलं. पण अमिताभ अमिताभ आहे. ७७ वर्षांच्या हा महान अभिनेता त्यांना उत्तर देत बसला नाही. एक ही मारा लेकीन क्या सॉलीड मारा या अमर अकबर एन्थोनी या सिनेमातल्या डायलॉग प्रमाणे त्यानं आपलं ट्विटर बायो बदललं. ज्यातून त्यांनी अनुराग कश्यपला ही गप्प केलं.
या ट्विटर बायोमध्ये अमिताभ बच्चन यांनी आपले वडिल कवि हरीवंशराय बच्चन यांच्या ओळी वापरल्यात. ते म्हणतात, "तुमने हमें पूज पूज कर पत्थर कर डाला ; वे जो हमपर जुमले कसते हैं हमें ज़िंदा तो समझते हैं "~ हरिवंश राय बच्चन...सोशल मीडिया ट्रोल करुन भल्या भल्यांना असहाय करतं. अगतिक करतं. आपण पण माणूस आहोत. तुम्ही माझं अस्तित्व मानता हे काय कमी आहे असा हा अमिताभ यांचा युक्तिवाद आहे.
७० चं दशक अमिताभ बच्चन यांच्या एँग्री यंग मॅन म्हणून गाजवलं. बिकट परिस्थितीत अडकलेला हिरो अखेर व्हिलनला संपवतो, जिंकतो. असाच या अमिताभच्या सिनेमांचा विषय होता. दिवार मधल्या विजय पासून तो मै आझाद हुं पर्यंत अमिताभचा हा एँग्री यंग मॅन आमआदमीसाठी आशावाद होता. म्हणूनच तो सर्वसामान्यांचा हिरो झाला. सध्या जी स्थिती देशात आहे, तशीच स्थिती ७०च्या दशकात होती. अमिताभच्या सिनेमातून आमआदमीच्या रागाला वाट करुन दिली. त्यातून अनेकजण रस्त्यावर उतरले. सिनेमात आले. एक सामाजिक आणि राजकीय अभिसारण सिनेमाच्या माध्यमातून कसं होऊ शकतं याची प्रचिती सलीम-जावेद या स्क्रिनप्ले आणि डायलॉग रायटर जोडीनं करुन दिली. अमिताभची ही जादू अजूनही बाकी आहे, वयाच्या ७७ व्या वर्षी अमिताभ यांच्या ७० च्या दशकातला एँग्री यंग मॅनशाश्वत आहे. असं लोकांना वाटतं. म्हणूनचं अमिताभकडे आशेनं पाहिलं जातं.