मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. आलिया पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेचे कारण म्हणजे व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये आलिया कश्यप तिच्या बॉयफ्रेंडसोबत टॉवेल गाऊनमध्ये दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ती हॉटेलमध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत बेडवर बसलेली दिसत आहे आणि दोघंही एकमेकांना किस करत आहेत. आलिया आणि तिच्या बॉयफ्रेंडचे लिपलॉक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये दोघंही खूप रोमँटिक दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाने स्वतः फोटो शेअर केले आहेत
आलिया स्वतः एक यूट्यूब चॅनल देखील चालवते आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या या अभिनेत्रीचे काही फोटोज इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो आलियाने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.



वाढदिवसा निमीत्त शेअर केली पोस्ट
या वर्षी ऑगस्टमध्ये आलियाने बॉयफ्रेंड शेनच्या वाढदिवसानिमित्त एक लांबलचक नोट लिहिली होती. आलियाने लिहिलं, '२२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह. तु मला जगातील सगळ्यात नशीबवान मुलगी आहेस अशी जाणीव करुन देतोस. तुला मिळवून मी भाग्यवान आहे आई लव यू फॉरेवर.'