अनुराग कश्यपच्या मुलीचे स्टायलिश फोटो
आपल्या हटके सिनेमांमुळे आणि लग्नामुळे कायम चर्चेत असलेला दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. पण सध्या चर्चेत आहे ती अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप. सध्या तिचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत. आणि ती सुद्धा सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असल्याचं समोर आलं आहे. आलिया अवघ्या १७ वर्षाची आहे.
मुंबई : आपल्या हटके सिनेमांमुळे आणि लग्नामुळे कायम चर्चेत असलेला दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. पण सध्या चर्चेत आहे ती अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप. सध्या तिचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत. आणि ती सुद्धा सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असल्याचं समोर आलं आहे. आलिया अवघ्या १७ वर्षाची आहे.
तिचे सोशल मीडिया अकाउंट अनेक फॅशनेबल फोटोंनी भरलेले आहे. इंडस्ट्रीत आलिया रणबीर कपूरची मोठी फॅन आहे. जेव्हा रणबीरच्या सेटवर फ्रेंड्ससोबत पोहोचली आलिया. रणबीर कपूरने २०१५ मध्ये अनुराग शर्मासोबत 'बॉम्बे वेलवेट' चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलिया तिच्या मैत्रिणींना घेऊन सेटवर रणबीरला भेटायला गेली होती. आलियाने रणबीरसोबत काही फोटोही क्लिक केले. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.
आलिया आणि श्रीदेवीची लहान मुलगी खूशी कपूर चांगल्या मैत्रीणी आहेत. या दोघी नेहमीच सोबत पार्टी करताना दिसतात. आलिया आणि सैफचा मुलगा इब्राहीमही चांगले मित्र आहेत. अनुरागच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे आलिया. अनुराग नेहमीच त्याच्या मुलीसोबत फोटोज् शेअर करत असतो.
१७ वर्षीय आलिया अनुरागची पहिली पत्नी आरती बजाजची मुलगी आहे. आरती आणि अनुरागचे लग्न २००३ साली झाले होते. २००९ साली दोघे वेगळे झाले. यानंतर अनुरागने अभिनेत्री कल्कि कोचलीनसोबत २०११ साली लग्न केले. पण हे लग्नही फार टिकले नाही आणि २०१५ साली दोघांचा घटस्फोट झाला. आता सुद्धा अनुराग कश्यपचं नाव २३ वर्षीय शुभ्रा शेट्टीसोबत चर्चेत आहे. आपल्यामुलीपेक्षा अवघ्या ६ वर्षाने मोठ्या असलेल्या मुलीशी त्याचं नाव जोडलं गेलं आहे. फिल्ममेकर अनुराग कश्यप आगामी चित्रपट 'भावेश जोशी' घेऊन येत आहेत. यात ते अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनला मुख्य भूमिकेत घेणार आहे.