`गँग ऑफ वासेपुर`चा तिसरा भाग लवकरच
प्रेक्षकांसाठी मोठी बातमी
मुंबई : 'गँग ऑफ वासेपुर' अनुराग कश्यपचा हा सिनेमा लोकप्रिय सिनेमांतील एक आहे. हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा याची भरपूर चर्चा होती. या सिनेमातील सगळ्याच गोष्टी म्हणजे गोष्ट, डायलॉग, दिग्दर्शन, अॅक्शन अशा सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या. या सिनेमांत एकापेक्षा एक दिग्गज कलाकार आहेत. या सिनेमाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीच्या करिअरला वेगळं वळण दिलं.
2012 मध्ये 'गँग्स ऑफ वासेपुर' या सिनेमाची कथा खूप मोठी होती. म्हणून दोन भागात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. यानंतर अगदी प्रेक्षक आणि कलाकार देखील सिनेमाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये जिम्मी शेरगिल या अभिनेत्याचं नाव अग्रस्थानी आहे. जो गँग ऑफ वासेपुरच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता जिम्मी शेरगिल अनुराग कश्यपच्या 'मुक्काबाज' या सिनेमात होता. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मी त्यांच्यासोबत खूप एन्जॉय केलं. मी ऐकलं आहे की, अनुराग या सिनेमाची तिसरा भाग करत आहे. मी त्या सिनेमात काम करू इच्छितो. मी हे अनुरागला भेटून सांगणार असल्याचं स्वतः जिम्मी शेरगिलने सांगितलं आहे. यामुळे आता गँग ऑफ वासेपुर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.