Anusha Dandekar in Relationship with : सध्या सगळीकडे सेलिब्रिटींच्या अफेअरची चर्चा सुरु असते. त्यांचे एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. सध्या सगळीकडे दोन कलाकारांची चर्चा सुरु आहे. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार... मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान हा अनेक तरुणींचा क्रश आहे. तर सध्या त्यानं शेअर केलेल्या फोटोमुळे त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भूषणनं बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची मेहुणी अनुषा दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूषणनं अनुषाच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं अनुषाच्या बर्थ डे पार्टीतील अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये भूषणनं लाल रंगाचं शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तर अनुषानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. अनुषासोबतचे अनेक फोटो शेअर करत भूषणनं कॅप्शन दिलं की 'सकारात्मकता, सौंदर्य आणि सामर्थ्याच्या शक्तीचा उत्सव साजरा करत आहे! तुला सेलिब्रेट करत आहे! प्रत्येक लढाईला निर्भयपणे तोंड देणाऱ्या… आणि सगळीकडे प्रेमाचा प्रसार करणाऱ्या योद्ध्याला सलाम. जे लोक तुला ओळखतात त्या सगळ्यांच्या आयुष्यात येऊन ज्या प्रकारे तू चांगला प्रभाव टाकला आहेस त्याप्रमाणे  तुझं हे वर्ष खूप सुंदर जावं.' 



पुढे भूषण म्हणाला, 'P.S : मला उशीर झालेला नाही… फक्त तुझ्यासारख्या सुंदर आत्मा असलेल्या व्यक्तीच्या वाढदिवसाचा उत्सव वाढवला आहे. तुझा वाढदिवस हा फक्त एक नाही तर त्याहून जास्त दिवस साजरा करायला हवा.... चल एक आठवडा आनंद... हसत साजरा करूया.' 


भूषणच्या या पोस्टवर अनुषानं देखील कमेंट केली आहे. कमेंट करत अनुषा म्हणाली, 'भूषी ही पोस्ट, फोटो आणि पॅरेग्राफ्स या सगळ्यांनी मला आनंद झाला. धन्यवाद, तू जे लिहिलं आहेस ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तू माझ्या वाढदिवसाचा एक भाग होता हे मला खूप आवडलं! पण एका आठवड्याऐवजी वर्षभर साजरा करूया! हेहे खूप धम्माल!'


हेही वाचा : प्रभू श्रीरामांविषयीच्या 'त्या' वक्तव्यामुळे नयनताराचा ‘अन्नापूरनी’ चित्रपट नेटफ्लिक्सवरून काढला


दरम्यान, त्या दोघांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'तुम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहात का?' दुसरा नेटकरी म्हणाला की 'तुम्ही दोघं लग्न करा लवकर.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुम्ही दोघं एकत्र खूप सुंदर दिसता.'