प्रभू श्रीरामांविषयीच्या 'त्या' वक्तव्यामुळे नयनताराचा ‘अन्नापूरनी’ चित्रपट नेटफ्लिक्सवरून काढला

Nayanthara Annapoorani : नयनताराचा ‘अन्नपूरनी’ हा चित्रपट ओटीटीवर काढून टाकण्यात आला आहे. त्यावरून एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

दिक्षा पाटील | Updated: Jan 12, 2024, 12:35 PM IST
प्रभू श्रीरामांविषयीच्या 'त्या' वक्तव्यामुळे नयनताराचा ‘अन्नापूरनी’ चित्रपट नेटफ्लिक्सवरून काढला title=
(Photo Credit : Social Media)

Nayanthara Annapoorani : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या ‘अन्नपूरनी’ या चित्रपटाची चर्चा सुरु होती. या चित्रपटात श्रीराम यांच्या विषयी एक उल्लेख करण्यात आला. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. नयनतारा विरोधात मध्यप्रदेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात असे म्हटले होते की नयनतारा तिच्या या चित्रपटातून प्रेक्षकांचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत आहे. 

कोणत्या गोष्टीवर घेतला आक्षेप?

खरंतर नयनतारानं या चित्रपटात एका पुजारीच्या मुलीची भूमिका साकारली आहे. पुजाऱ्याची मुलगी असून नयनताराच्या भूमिकेनं हिजाब परिधान करत बिर्यानी बनवली आहे. त्यासोबत या चित्रपटात म्हटलं आहे की श्रीराम आणि सीता हे वनवासात असताना त्यांनी मांसाहार केला. या प्रकरणानंतर नयनताराचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवरून काढून टाकण्यात आला आहे. आता नयनताराला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. तिच्यावर हिंदूच्या भावना दुखावल्याचे आरोप करण्यात आले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सगळ्या आरोपांमध्ये नेटफ्लिक्सनं लगेच हा चित्रपट त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला. त्याचं कारण म्हणजे लोकांनी या चित्रपटाला हिंदू विरोधी चित्रपट असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटाविरोधात धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करण्यात आला होता. हा चित्रपट 1 डिसेंबर  रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. तर 29 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. ओटीटीवर प्रदर्शित झाल्याच्या एका आठवड्यात हा चित्रपट काढून टाकण्यात आला. दुसरीकडे या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर नंबर 2 ला ट्रेंड करत होता. सध्या सगळीकडे नयनताराच्या या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील कलाकारांविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात नयनतारासोबत महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेता जय, सत्यराज, कार्तिक कुमार, पोर्णिमा रवी हे कलाकार दिसतात.