`परी`चा नवा प्रोमो प्रदर्शित...
अनुष्का शर्माचा परी सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चांगला चर्चेत आहेत.
मुंबई : अनुष्का शर्माचा परी सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चांगला चर्चेत आहेत. सिनेमाचे पोस्टर, टिझर अत्यंत भीतीदायक आहेत. ते पाहताना अंगावर काटा येतो किंवा घाम फुटतो. असाच एक झोप उडवणारा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो देखील घाबरगुंडी उडवणारा आहे.
काय आहे त्या प्रोमोत?
परी सिनेमाचा हा पाचवा प्रोमो आहे. यात अंधाऱ्या रात्री अनुष्का फिरत असते. फिरताना ती एका तलावाजवळ जाते. ती पाण्यात पाहते तर तिला तिचा चेहरा रक्ताने माखलेला दिसतो. त्यानंतर तलावातील सर्व मासे मरतात व पाण्यावर तरंगू लागतात. तुम्हीही पहा...
प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
या सिनेमाची निर्मिती अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत झाली असून यापूर्वी तिने ‘एन. एच. १०’ आणि ‘फिल्लोरी’ या सिनेमांची निर्मिती केली होती. आता या सिनेमाचा थरार अनुभवण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.