अनुष्काचे सासरी दिल्लीला असे झाले स्वागत
लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर आता विराट - अनुष्का स्वदेशी परतले आहे.
मुबंई : लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर आता विराट - अनुष्का स्वदेशी परतले आहे.
इंस्टाग्राम पेजवर virushka_folfy या दोघांचा दिल्लीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. विराट - अनुष्का या फोटोत दिसत आहेत. या फोटोमध्ये विराटची बहिण म्हणजे अनुष्काची ननंद देखील आहे. विराटच्या या मोठ्या बहिणीचं नाव आहे भावना. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने 11 डिसेंबर रोजी इटलीमध्ये लग्न केलं. यानंतर हे दोघे हनीमूनला कुठे जाणार अशी चर्चा रंगली असताना या दोघांनी फिनलँड गाठलं. तेथील काही फोटो देखील शेअर केले. 21 डिसेंबरला आपल्या मित्र - परिवारासाठी या दोघांनी रिसेप्शन प्लान केलं आहे.
त्यानंतर 26 डिसेंबरला मुंबईतील रिसेप्शनसाठी ते दोघे मुंबईत येणार आहेत. आणि अगदी त्याच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली आपल्या साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होईल. अशी चर्चा आहे की विराटसोबत अनुष्का देखील जाणार आहे.
दोघांनी इटलीमध्ये त्यांचा हा शाही विवाहसोहळा सगळ्यांपासून लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यानंतर कोहली आणि स्वतः विराटने त्यांच्या लग्नाची आनंदाची बातमी सगळ्यांना दिली.