मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनुष्का शर्मा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्री बर्‍याच काळापासून चित्रपटाच्या पडद्यापासून दूर आहे. परंतु ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काने दाखवली मेहनत
अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या वर्कआउट सत्रादरम्यानचा एक मिरर सेल्फी शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री योगा पॅंट आणि क्रॉप टॉप घातलेली दिसत आहे. त्याचबरोबर, या फोटोमध्ये तिची मेहनत स्पष्टपणे दिसून येतेय. हा फोटो शेअर करत अनुष्काने एक सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे. यामध्ये तिने लिहिलं आहे की, 'मेहनत केली आणि शो ऑफ नाही केला तर काय मेहनत केलीत.'



विराटसोबत शेअर केला फोटो
अनुष्का शर्माने नुकताच पती विराट कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघंही एकदम मस्त अंदाजात दिसत होते आणि दोघ एकमेकांकडे पाहून कॅमेऱ्यात पोज देत असल्याचं दिसत होतं. त्याचबरोबर, कॅप्शनमध्ये, अनुष्काने विराटचं वर्णन एक गोंडस मुलगा म्हणून केलं होतं आणि लिहिलं  की, मला या मुलासोबत नहमीच बँड सुरू करायची ईच्छा होती. अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर अशा पोस्ट शेअर करून चर्चेत असते.