Anushka Sharma : बॉलिवूड सुपरस्टार अनुष्का शर्माने तिच्या सूपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली. बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या आपला आगामी चित्रपट चकदा एक्स्प्रेसच्या (Chakda Xpress) शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची शुटिंग कोलकोत्तामध्ये (Kolkata) सुरु आहे. (anushka sharma on tour with vamika where exactly are these two traveling virat kohli nz)


हे ही वाचा - Baba Vanga नाहीतर चक्क Kangana Ranaut ने केली होती ट्विटर संदर्भात भविष्यवाणी, आणि घडलं ही तसंच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चकदा एक्स्प्रेस हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि गोलंदाज झुलन गोस्वामी ( Jhulan Goswami) हिच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा भारतीय महिला क्रिकेटर आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले होते. 


हे ही वाचा - श्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या


 


अनुष्का शर्माने या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण कोलकोत्त्यात केले आहे जे झुलन गोस्वामीचे मूळ गाव आहे. दरम्यान, अनुष्का शर्माने तिच्या कोलकोत्ता शूटिंगशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


 


 



 


अनुष्का कोलकाता तसेच पश्चिम बंगालच्या अनेक भागात या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने कोलकोत्यात खूप धमाल केली. चित्रांमध्ये, अभिनेत्री मंदिरांना भेट देण्यापासून ते स्ट्रीट फूड आणि पारंपारिक पदार्थांपर्यंत सर्व गोष्टींचा आनंद घेताना दिसत आहे. तिचे कोलकोत्ता फोटो शेअर करत अनुष्काने मजेशीर कॅप्शन लिहिले, "खा...आणि  प्रार्थना करा...माझे प्रेम..."


हे ही वाचा - माकडाने लढवली 'आयडीयाची कल्पना', जंगलाचा राजाही असा फसला, पाहा Viral Video



याआधी अनुष्काने खुलासा केला होता की या मौजमजेने भरलेल्या शहराला तिच्या हृदयात नेहमीच खास स्थान आहे. एका मुलाखतीत अनुष्काने सांगितले होते की, कोलकोत्ता हे शहर तिला फार प्रिय आहे. शहर आणि तेथील लोकांची उबदारता, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, सुंदर वास्तुकला इत्यादी सर्व गोष्टी कोलकोत्याला 
तिला आवडतात आणि 'चकदा एक्सप्रेस'साठी या मजेदार शहरात परत आल्याचा आनंद आहे.



या अभिनेत्रीने 'परी' चित्रपटाचे शेवटचे शूटिंग येथे केले आणि या प्रकल्पाच्या शूटिंगच्या अनेक आठवणी तिच्या मनात आहेत. झुलन गोस्वामीचे नाव जागतिक क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान महिला गोलंदाजांमध्ये समाविष्ट आहे. त्याच्या बायोपिकमध्ये अनुष्का मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अनुष्काने क्रिकेटर होण्यासाठी खूप मेहनत घेतली.