मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर Baby Bump सह अनेक फोटो शेअर करत असते. नुकताच अनुष्काने एक फोटो शेअर केलाय यामध्ये तिने बेबी बंपसह शीर्षासन करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. महत्वाचं म्हणजे यावेळी विराट कोहली (Virat Kohli) अनुष्काला मदत करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत अनुष्का बेबी बंपसह शीर्षासन करत आहे. आणि विराट कोहली काळजी घेत तिचे पाय पकडत आहे. तिला मदत करत आहे. अनुष्काने हा फोटो शेअर करत,Hands Down म्हणत पोस्ट लिहिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अनुष्का अशी आसनं करत आहे. या आसनांसोबत योग्य ती काळजी ती घेत असल्याचं देखील म्हणत आहे. 



अनुष्का पुढे लिहिते की, योगाचे हे सेशन अनुष्काने आपल्या शिक्षकांच्या आभासी उपस्थितीत केले आहे. अनुष्का पुढे म्हणते की, मला आनंद आहे की, मी गरोदरपणातही ही प्रॅक्टीस करू शकते. 


अनुष्काने पोस्टमध्ये काय लिहिलंय 


‘हा सर्वांत अवघड व्यायामाचा प्रकार आहे. योगसाधना माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. गरोदर असण्यापूर्वी मी जी काही योगासनं करत होती, ती सर्व आता गरोदर असतानाही करू शकते असं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं. एका विशिष्ट टप्प्यानंतर खूप पुढेपर्यंत वाकण्याचे व्यायाम आणि ट्विस्ट्स वगळता आवश्यक आधारसह मी योगासनं करू शकते. शीर्षासन मी गेल्या अनेक वर्षांपासून करतेय. भिंतीच्या आधारे मी हे करू शकले आणि सुरक्षेच्या खातर माझ्या पतीने मला आधार दिला. हे सुद्धा माझ्या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करू शकले, जे पूर्ण वेळ माझ्यासोबत ऑनलाइन जोडले गेले होते. माझ्या गरोदरपणातही मी योगासनं करू शकते याचा मला खूप आनंद आहे