व्हिडिओ : रणवीर सिंह जवळ येताच अनुष्काने फटकारलं
`बँड बाजा बारात` जोडी पुन्हा एकत्र
मुंबई : बॉलिवूड स्टार रणवीर सिंह त्याच्या अतरंगी स्टाइल आणि मस्करीच्या स्वभावामुळे ओळखला जातो. कार्यक्रमात रणवीर सिंह असला की, एक वेगळीच चमक त्या कार्यक्रमाला येते आणि तो चर्चेत राहतो. असाच एक कार्यक्रम चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे रणवीर सिंहला अनुष्काने दिलेलं सडेतोड उत्तर
अनुष्काने रणवीर सिंहला फटकारलं असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका अवॉर्ड सोहळ्यातील आहे. रणवीर आणि अनुष्का मुंबईतील एले ब्युटी अवॉर्ड्स सोहळ्यात सहभागी झाली होती. या सोहळ्यात रणवीर सिंह अनुष्काजवळ काही प्रश्न विचारायला जाणार तेवढ्यात तिने रणवीरला फटकारलं.
रणवीर या कार्यक्रमात अनुष्काला विचारतो की, तुझ्यामते यश म्हणजे काय? आणि तो तिच्याजवळ जाणार एवढ्यातच अनुष्का त्याला आठवण करून देते, यू आर नॉट ए होस्ट... (तू सूत्रसंचालक नाही आहेस) हे ऐकताच रणवीर तेथून निघून जातो. रणवीर या कार्यक्रमात अगोदर यशाबद्दल भरभरून बोलतो आणि मग अनुष्काकडे जातो.
रणवीर सिंहने अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत 'बँड बाजा बारात' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तर आता रणवीर सिंह त्याच्या आगामी '83' सिनेमात दिसणार आहे. त्याच्यासोबत यावेळी दीपिका पदुकोणदेखील असणार आहे. तर अनुष्का शर्मा सध्या सिनेमांपासून दूर आहे.