मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या दुसऱ्या मुलाचं प्लॅनिंग करत आहेत अशी सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र स्त्रोताकडून पुष्टी झाल्यामुळे ही बातमी व्हायरल झाली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, अनुष्का गरोदरपणाच्या दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये आहे आणि दोघंही लवकरच त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची अधिकृत घोषणा करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हे कपल योग्य वेळेची वाट पाहत आहेत. आता हे दोघं लवकरच या बातमीची पुष्टी करतील याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. आता एकीकडे अनुष्काच्या प्रेग्नेंसीची बातमी व्हायरल होत आहे तर दुसरीकडे तिची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ही मुलाखत अनुष्काच्या ' छकडा एक्सप्रेस' चित्रपटादरम्यानची आहे. यामध्ये तिने आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी आनंदाने कामातून ब्रेक घेण्याबद्दल बोलत आहे.


या जुन्या मुलाखतीत अनुष्का तिच्या शो 'रौंदेवू विद सिमी ग्रेवाल'मध्ये सिमी ग्रेवालसोबत दिसत आहे. जिथे अभिनेत्रीने सांगितलं होतं की, लग्न आणि मुलं हे तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि कदाचित तिने यासाठी अभिनय देखील सोडला असेल. "लग्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला लग्न करायचं आहे आणि मला माझ्या मुलांना जन्म द्यायचा आहे, आणि जेव्हा कधी मी लग्न करेन तेव्हा मला काम करायचं नाही."


2021 मध्ये अनुष्का शर्माने मुलगी वामिकाला जन्म दिला. मात्र यानंतर तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अनुष्का शेवटची 'झिरो'मध्ये दिसली होती आणि जवळपास 7 वर्षे झाली आहेत ती अभिनेत्री कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. त्यामुळे तिच्या दुसऱ्या अपत्यानंतर ती दीर्घ किंवा कायमचा ब्रेक घेणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये दिसत आहे.


अनुष्का मागील बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा इतर ठिकाणी दिसलेली नाही. इतकंच नाही तर नेहमी विराटला पाठिंबा देण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात जाऊन चेअरअप करणारी अनुष्का यंदाच्या वर्ल्डकपदरम्यान स्टेडियममध्ये दिसणार नाही. यामागील खरं करणं हे प्रेग्नंसीचं असल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी होणाऱ्या आईच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी म्हणजेच रुटीन प्रेग्नसी चेकअपसाठी एका मॅटर्निटी होमला भेट दिल्याचेही समजते. 


यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो काढले मात्र, विराट आणि अनुष्का दोघांनी पापाराझींना हे फोटो कुठेही प्रकाशित करु नका. आम्ही स्वत: लवकरच ही बातमी जाहीर करु अशी कळकळीची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत हे फोटो समोर आणण्याचं पापाराझींनी टाळल्याचं समजतं. मात्र, आता अनुष्का आणि विराटच्या जवळच्या व्यक्तीने हे दोघे दुसऱ्यांचा आई-बाब होणार असल्याच्या वृत्ताला नाव न सांगण्याच्या अटीवर दुजोरा दिल्याचं समजतं.