मुंबई : अभिनेत्री अनुष्का शेट्टी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीचं सक्रिय आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते सोशल मीडियावर #AskAnushka या हॅशटॅगचा वापर करत ती चाहत्यांसोबत प्रश्न-उत्तरांचा खेळ खेळत आहे. या खेळादरम्यान तिने तिच्या जीवनातील अनेक गोष्टींवर स्पष्टीकरण दिले. सोशल मीडियावर रंगलेल्या प्रश्न-उत्तरांच्या तासाला तिने 'निशब्दम' चित्रपटासोबतच अनेक विषयांवर चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तिच्या एका चाहत्याने तुला प्रभास सोबत स्क्रिन शेअर करताना पाहायचं आहे. असा प्रश्न केला. यावर अनुष्का म्हणाली, 'जर एखाद्या चांगल्या कथेकरीता माझी आणि प्रभासची निवड करण्यात आली तर मी नक्कीचं प्रभास सोबत स्क्रिन शेअर करेल. असं म्हणतं तिने चाहत्यांचे आभार मानले.  



आणखी एका युजरने प्रभास आणि अनुष्काच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभास आणि अनुष्काच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. यावेळी तिने व्हायरल होत असलेल्या फोटोवर देखील स्पष्टीकरण दिलं. 


ती म्हणाली 'व्हायरल होत असलेला फोटो 'मिर्ची' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा आहे. 'मिर्ची' चित्रपट माझ्यासाठी अत्यंत खास आहे.' प्रभास आणि अनुष्का मिर्ची चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकले होते. तेव्हा या जोडीला चाहत्यांनी चांगलेचं डोक्यावर घेतले होते. 


प्रभास 'साहो' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला होता. तर अनुष्काचे 'निशब्दम' आणि 'सायलेंस' चित्रपट कोरोना व्हायरसमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले होते. शिवाय प्रभास लवकरच अभिनेत्री पूजा हेडगेसोबत  'राधेश्याम' चित्रपटाच्या माध्यमातून झळकणार आहेत. ज्यामध्ये अभिनेता सैफ अली खान देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.