Prabhas Cheated on by Anushka Shetty : दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच 'बाहुबली' आणि 'साहो' या चित्रपटांमुळे सर्वच स्तरांतील प्रेक्षकांच्या मनावर अभिनेता प्रभासने राज्य केलं. चित्रपटांसोबतच कायमच त्याच्या खासगी आयुष्याविषयीही जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक अभिनेता, सेलिब्रिटी म्हणून वावरणारा प्रभास तसा मितभाषीच. अशा या मितभाषी प्रभासचं नाव अभिनेत्री आणि 'बाहुबली' या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्यासोबत अनेकदा जोडलं गेलं. 


प्रभास आणि अनुष्का शेट्टीने 'बाहुबली' या ब्लॉकबस्टर चित्रपटात 'बाहुबली आणि देवसेना'च्या भूमिका साकारल्या होत्या.  मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत आणि ते खूपच गंभीर आहेत.


अलीकडेच प्रभासचे नाव त्याची 'आदिपुरुष' को-स्टार क्रिती सॅननसोबतही जोडलं जात आहे.  क्रिती आणि प्रभास त्यांच्या नात्याबद्दल काहीही बोलले नाहीत पण प्रभास आणि अनुष्का शेट्टीबद्दल काही माहिती समोर येत आहे. ताज्या बातम्यांनुसार, प्रभास आणि अनुष्काचं ब्रेकअप झालं आहे कारण अभिनेत्रीने त्याची फसवणूक केली आहे! 


अनुष्का शेट्टी-प्रभासचे ब्रेकअप!
प्रभास आणि अनुष्का शेट्टीचे ब्रेकअप झाल्याचे ताज्या गॉसिप्स आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. दोघंही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते पण आता प्रभासने ठरवलं आहे की तो अनुष्का शेट्टीपासून दुरावणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, याचं कारण त्याचं क्रिती सेननसोबतचं नाव जोडलं असू शकतं, मात्र बहुतेक मीडिया रिपोर्ट्स काही वेगळेच सांगतात.


अनुष्का शेट्टीच्या अफेअरमुळे प्रभास तिच्यापासून दुरावला!
रिपोर्ट्सनुसार, प्रभास आणि अनुष्का शेट्टी एकमेकांसोबत खूप खूश होते पण आता एका 'सिनियर हिरो'सोबत अफेअरच्या अफवांमुळे प्रभासने अभिनेत्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभास आणि अनुष्का शेट्टी 'चांगले मित्र' राहतील पण त्यापलीकडे दोघांमध्ये काहीही नाही.


नात्यात दुरावा आला असला तरीही या दोघांनी त्यांच्या कामाची कायमच प्रशंसा केली आहे. अनुष्काने त्याच्या कामाची कायमच स्तुती केली आहे. तर, ज्यावेळी प्रभासला अनुष्काविषयीचा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ती एक खुप चांगली अभिनेत्री असल्याचं तो म्हणाला होता. प्रेमाच्या नात्यात हे दोघं एकत्र नसले तरीही अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत मात्र ते कायम एकमेकांच्या पाठीशी उभे असल्याचं पाहायला मिळत आहे.