मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहिण अंशुला कपूर हे चाहत्यांच्या लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहेत. सोशल मीडियावर बहिण-भावाची जोडी अतिशय हिट आहे. अंशुला कायमच आपले सुंदर फोटो, कौटुंबिक वेळ, प्रेरणादायी वाक्ये आणि अनेक गोष्टी इंस्टाग्रामवर शेअर करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच अंशुलाने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून चाहते हैराण झाले आहे. अंशुलाने नुकतंच वजन कमी केलं आहे. 


पण हा प्रवास तिच्यासाठी तितका सोपा नव्हता. वजन कमी करण्यासाठी, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी अंशुलाला दोन वर्षे लागली. 



अजूनही अंशुलाचा हा प्रवास सुरू आहे. स्वतःच्या फिटनेसकडे अंशुला आजही लक्ष देत आहे. अजूनही आपल्या शरीरात बदल करण्याचा अंशुला प्रयत्न करत आहे. अंशुला स्वतःला योग्य आणि सुंदर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आणण्याचा विचार करत आहे. 



अंशुलाने हा फोटो पोस्ट केलाय. ज्यामध्ये तिने भावनिक कॅप्शन लिहिली आहे. अंशुलाने लिहिलं आहे की, आताच्या परिस्थितीत अंशुलाला निरोगी आरोग्य ठेवायचं आहे. 


मी स्वतःला हेल्दी पाहिलं. मला माझं निरोगी आयुष्य ठेवण्यासाठी शरीरासोबतच मानसिक स्वास्थ उत्तम ठेवणं गरजेचं आहे. 


मला लक्ष द्यायचंय की, मला आतून कोणती गोष्ट त्रास देतेय. याचा विचार करायचा आहे. कोणत्याही गोष्टीवर काम करण्यापूर्वी आपली मानसिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. मी माझ्यासाठी असह्य आणि कठीण गोष्ट आहे. खूप थेरेपी, अश्रू, भीती, सेल्फ डाएट यासारख्या गोष्टींचा विचार करावा लागला.