मुंबई : २०२१ हे वर्ष प्रत्येक कलाकारासाठी खास ठरतंय. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. तर काही कलाकारांच्या घरी चिमुकली पाऊलं दुडदुडणार आहेत. अनुष्का-विराटच्या (Anushka - VIrat)  घरी 'वामिका' (Vamika)चा जन्म झाला. तर कपिल शर्मा- गिन्नी चतरथने मुलाचं स्वागत केलं. तसेच करीना पण दुसऱ्यांदा आई झाली आहे. आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. आयुष्मान खुरानाचा लहान भाऊ आणि अभिनेता अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana become father now)  लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी आकृती गरोदर असल्याचं समजतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अपारशक्ती-आकृती त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये आकृती बाळाला जन्म देईल. दोन्ही कुटुंबात यावेळी आनंदाचं वातावरण आहे. मात्र अद्याप खुराना कुटुंबियांनी कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. 



७ वर्षे झाली लग्नाला 


अपारशक्ती खुरानाने आकृती आहुजासोबत २०१४ साली लग्न केलं. दोघांची ओळख चंदीगडमधील एका डान्स क्लासमध्ये झाली. आकृती अनेकदा अपारशक्तीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आकृतीची खुराना कुटुंबासोबतची बॉन्डिंग खूप खास आहे. अपारशक्तीने देखील सिनेमात पदार्पण करण्यापूर्वीच लग्न केलं होतं. 



अपारशक्तीला २०१६ रोजी आमिर खानच्या 'दंगल' सिनेमातून लोकप्रियता मिळाली. या सिनेमात त्याने फोगट बहिणींच्या चुलत भावाचा रोल केला होता. तसेच सिनेमाची कथा सांगणारा नरेटर देखील होता. या सिनेमातील त्याच्या कामाचं कौतुक झालं. त्यानंतर 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'स्त्री', 'लुका छुपी', 'हॅप्पी' सारख्या सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारली. अपारशक्ती लवकरच 'हेल्मेट' आणि 'कनूप्रिये'मध्ये दिसणार आहे.