Is AR Rahman Taking Break from Music : लोकप्रिय कंपोजर आणि गायक एआर रहमान गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एआर रहमान यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली. एआर रहमान आणि पत्नी सायरा बानो यांनी 29 वर्षांचा संसार इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी दिली होती. या सगळ्यात आणखी अशी एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यानं एआर रहमान यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. पत्नीसोबत विभक्त झाल्यानंतर एआर रहमान यांनी करिअरमधून ब्रेक घेऊ शकतात. पण त्यांची लेक खतीजा रहमाननं या सगळ्या चर्चांवर मौन सोडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एआर रहमान यांची लेक खतीजा रहमाननं तिच्या X अकाऊंटवरून एक पोस्ट रिपोस्ट करत शेअर केली आहे. तिनं रिपोस्ट केलेल्या पोस्टमध्ये एआर रहमानचा स्टेजवर परफॉर्म करतानाचा फोटो असून त्यावर लिहिलं आहे की एआर रहमान 1 वर्षांचा ब्रेक घेणार असून तो संगीताला मिस करणार आहे. ही पोस्ट पाहताच चिडलेल्या खतीजा रहमाननं ही रिपोस्ट केली आणि म्हणाली 'कृपया अशा अफवा पसरवू नका.'



गेल्या महिन्यात 20 तारखेला एआर रहमाननं सोशल मीडियावर सायरा बानोसोबत विभक्त झाल्याची घोषणा केली. त्यांनी लिहिलं की आम्हाला आशा होती की 'आम्ही 30 वर्ष पूर्ण करू, पण असं वाटतं की सगळ्या गोष्टींचा एक अनपेक्षीत अंत असतो.' 


एआर रहमाननं विभक्त होण्याचा खुलासा केला. त्यानंतर त्याच्या टीममधील मोहिनी डे नं देखील पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर ही चर्चा होऊ लागली की काय खरंच एआर रहमान आणि मोहिनी डेचं अफेअर सुरु होतं. त्यामुळे त्याचं पत्नीसोबतचं नातं मोडलं. 


हेही वाचा : 'रोशन' कुटुंबातील 'तो' ज्यानं अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करिअर करत कमावली कोट्यावधींची संपत्ती


त्यानंतर मोहिनी डेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सत्य काय आहे याचा खुलासा केला. ती म्हणाली की एआर रहमान हा तिच्या वडिलांसारखा आहे. त्याशिवाय तिनं ती चेतावनी देखील दिली की ती लीगल अ‍ॅक्शन घेणार.