जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर आराध्या ट्रोल
काहीजण खाल्लेल्या थाळीतच छेद करतात अशा आशयाचं वक्तव्य जया बच्चन यांनी केलं.
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन संबंधी अनेक खुलासे समोर येत आहे. दरम्यान मंगळवारी राज्यसभेत शून्य प्रहारमध्ये ड्रग्स मुद्द्यावर जया बच्चन भाष्य केले. ड्रग्ज मुद्द्यावरुन वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार आणि अभिनेता रवी किशन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधत काहीजण खाल्लेल्या थाळीतच छेद करतात अशा आशयाचं वक्तव्य जया बच्चन यांनी केलं. त्यानंतर अनेक कलाकारांना त्यांना पाठिंबा देखील दिला. परंतु काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ट्रोल केलं आहे.
मात्र आता ही बाब जया बच्चन यांच्यापर्यंत मर्यादित राहिली नसून त्यांची नात आराध्यावर देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधण्यात येत आहे. एका युजरने जया बच्चन यांच्या वक्तव्यावर ट्विट करत ‘प्रत्येकाची वेळ येते. काळजी करु नका आराध्या बच्चन लवकरच मोठी होणार आहे’ असे म्हटले आहे.
यावर अभिनेत्री काम्या पंजाबीने त्या ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे. ती म्हणाली, 'ट्रोल करणारे सर्वच आजारी असतात. तुमची बाजू घेवून मत मांडलं तर ती व्यक्ती चांगली, आणि जर सत्याची बाजू मांडली तर तुम्ही कोणाच्या मुलांना देखील वादात खेचत. मी या सर्व प्रसंगांना तोंड दिलं आहे.' कोणाला ट्रोल करणं तुमच्या सारख्या लोकांसाठी ट्रेंडच झाला. या आशयाचे ट्विट काम्याने केले आहे.