मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान ( Arbaaz Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अरबाज पत्नी मलायका अरोराला (malaika arora) घटस्फोट दिल्यानंतर आता इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत (giorgia andriani) रिलेशनशिपमध्ये आहे. पण तुम्हाला जॉर्जिया ही अरबाजची पूर्वाश्रमीची पत्नी मलायकाची फॅन आहे असे तिनं म्हटलं आहे. जॉर्जियानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. इतकंच नाही तर मलायकाला अनेक वेळा भेटल्याचा दावाही जॉर्जियानं केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : 'तो माझ्या जवळ...', अभिनेत्रीच नाही तर अभिनेतेही करतात Casting Couch चा सामना


जॉर्जियानं एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, 'मला मलायका खूप आवडते आणि मी तिच्या आजवरच्या प्रवासाचे खूप कौतुक करते. तिनं शून्यातून सुरुवात केली आहे. ती एक मॉडेल होती आणि तिने ज्या पद्धतीने हे केले. मला त्या याचं कौतुक वाटतं. माझ्यासाठी, ती नक्कीच कोणीतरी आहे ज्या महिलेची मी प्रशंसा करते."


अरबाजच्या वडिलांचे आणि भावांचे कौतुक केले


पुढे जॉर्जिया अरबाजचे वडील सलीम खान आणि दोन्ही भाऊ सलमान खान आणि सोहेल खान यांच्या भेटीबद्दलही बोलली. 'ते एक अद्भुत व्यक्ती आहे. ते खूप मोकळ्या मनाचे आहेत. मला वाटतं की त्यांना भेटणं हा सगळ्यात चांगला अनुभव होता.' (arbaaz khan girlfriend giorgia andriani talks about her equation with his ex wife malaika arora) 



2017 मध्ये अरबाजचा मलायकासोबत घटस्फोट झाला


अरबाजने 1998 मध्ये मलायका अरोरासोबत लव्ह मॅरेज केलं होतं. दोघांना 20 वर्षांचा मुलगाही आहे. त्यांच्या मुलाचे नाव अरहान खान आहे. 19 वर्षे लग्नबंधनात राहिल्यानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2016 मध्ये त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली आणि 2017 मध्ये त्यांच्या घटस्फोटाला अधिकृत मान्यता मिळाली. मलायकापासून घटस्फोट घेतल्यानंतर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे आणि ते गेल्या 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दुसरीकडे मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.