Arbaaz Khan Shura Wedding : बॉलिवूड अभिनेता अरबाज खाननं गेल्या डिसेंबरमध्ये मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केलं. दोघांनी खूप प्रायव्हेटली लग्न केलं. त्यांच्या लग्नात कुटुंबातील जवळचे लोक आणि काही मित्र उपस्थित होते. दोघांनी अचानक लग्न केल्यानं चाहते देखील आश्चर्य चकीत झाले होते. त्यातही त्या दोघांमध्ये 22 वर्षांचा फरक आहे. ज्यावर चांगलीच चर्चा सुरु झाली होती. आता अशी चर्चा सुरु आहे की अरबाजच्या दोन्ही बहिणी म्हणजेच अलवीरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्माला शूरा आवडत नव्हती. इतकंच नाही तर सलमान खाननं त्यानंतर अरबाज खानला या लग्नाविषयी पुन्हा एकदा विचार कर असा सल्ला देखील दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झूमच्या रिपोर्टनुसार, ज्या कारणामुळे खान कुटुंब आनंदी नव्हते, ते म्हणजे शूराचा भूतकाळ. शूराचं या आधी लग्न झालं होतं. तिचा पती हा इंटेरियर डिझायनर होता आणि त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. रिपोर्ट्सनुसार, शूराची लेक तिच्याकडेच राहते आणि ती मुलीला तिच्या वडिलांना भेटू देखील देत नाही. शूराच्या भूतकाळाविषयी अरबाजच्या कुटुंबाला काही माहिती नव्हती. जेव्हा त्यांना याविषयी कळालं तेव्हा ते सगळे दुखी झाले. 



वेबसाइटनुसार, सलमान खाननं अरबाजला लग्नाच्या आधी पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला. खरंतर अरबाजनं स्वत: हा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबातील लोक त्यांच्या लग्नात पोहोचले. 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अरबाजनं सांगितलं की कशी त्याची आणि शूराची भेट पटना शुक्लाच्या सेटवर झाली. त्याचं प्रोडक्शन अरबाज करत होता. या चित्रपटात रवीना टंडन मुख्य भूमिका साकारत होती. शूरा ही रवीनाची मेकअप आर्टीस्ट आहे. अरबाजनं सांगितलं की शूरा ही रवीनासोबत जवळपास गेल्या 7-8 वर्षांपासून काम करत होती. खरंतर, पटना शुक्लाच्या अगोदर त्यानं ना कधी शूरा विषयी ऐकलं होतं ना तिला कधी पाहिलं होतं. 


हेही वाचा : सलमान खानचा मेहूणा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार! लग्नातील मेन्यू आला समोर


अरबाजनं सांगितलं की पटना शुक्लाच्या सेटवर भेटल्याच्या बऱ्याच काळानंतर त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. सेटवर सुरुवातीला त्या दोघांमध्ये फार कमी बोलणी झाली. त्यानंतर दोघं अनेकदा भेटले आणि जेव्हा चित्रपटाची रॅप पार्टी होती त्यानंतर ते दोघं सतत भेटू लागले. त्यानं सांगितलं की जेव्हा लोकांना त्यांच्याविषयी कळलं तेव्हा त्या दोघांना रिलेशनशिपमध्ये येऊन 1 वर्ष झालं होतं.