सलमान खानचा मेहूणा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार! लग्नातील मेन्यू आला समोर

गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीत लग्नसराई सुरु झाली आहे. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाची तर चांगलीच चर्चा सुरु झाली होती. आता सगळ्यांचे लक्ष पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. आज ते दोघं सप्तपदी घेणार आहेत. या सगळ्यांत त्यांचा वेडिंग मेन्यू समोर आला आहे. 

| Mar 15, 2024, 17:14 PM IST
1/7

'ई टाइम्स'नं दिलेल्या रिपोर्टनुसार, पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांच्या लग्नाचा मेन्यू खास आहे. त्याचं कारण स्वत: पुलकितनं ठरवला आहे.

2/7

कुठल्या कुठल्या डिश?

मेन्यूमध्ये पुलकितनं वेगवेगळ्या देशातील डिश मेन्यूत ठेवल्या आहेत त्याशिवाय दिल्लीच्या वेगवेगळ्या आयकॉनिक आणि लोकप्रिय ठिकाणांचे चाट देखील त्यात आहेत. 

3/7

ताटात दिसतील भारताच्या या राज्यातील पदार्थ

हे सगळं इथेच थांबलं नाही तर त्यांना दिल्ली, राजस्थान, वाराणसी पासून कोलकाता सारख्या शहारांमधील विविध पदार्थ खायला मिळणार आहेत. 

4/7

कधी झाली लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात?

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदाच्या लग्नाच्या अगोदरची सगळे कार्यक्रम 13 मार्च पासून सुरु झाले आहेत. त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमात पंजाबची लोकप्रिय नूर जोरा गद्दा मंडळीनं एक स्पेशल परफॉर्मन्स दिला होता. 

5/7

इथे घेणार सप्तपदी!

तर आज 15 मार्च रोजी ते सप्तपदी घेणार असून दिल्लीच्या आईटीसी ग्रॅंडमध्ये सप्तपदी घेणार आहेत. तर पंजाबी पद्धतीनं ते लग्न करणार आहेत.   

6/7

कमाईत कोण आहे पुढे?

पुलकित आणि क्रिती विषयी बोलायचं झालं तर रिपोर्ट्सनुसार, पुलकितची एकूण संपत्ती ही 41 कोटी आहे तर क्रितीची देखील तितकीच एकूण संपत्ती आहे. 

7/7

पुलकितचं दुसरं लग्न

पुलकित सम्राटचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्यानं सलमान खानची राखी बहीण श्वेता रोहिरासोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या 11 महिन्यांनंतर त्यांच्यात वाद होऊ लागले आणि त्यांनी घटस्फोट घेतला.