Age Difference मुळे अरबाज ट्रोलर्सच्या निशाण्यावर, दुसऱ्या पत्नीसोबतच्या त्या व्हिडीओवरून चर्चा
Arbaaz Khan trolled over his second wife : अरबाज आणि त्याची दुसरी पत्नी शुराला एकत्र पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, कोणी म्हणालं मुलगी तर कोणाला आली मलायकाची आठवण
Arbaaz Khan trolled over his second wife : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खाननं मेकअप आर्टिस्ट शुरा खानसोबत काही दिवसांपूर्वी लग्न केलं. शूरा खान ही त्याची दुसरी पत्नी आहे. नुकतेचं अरबाज आणि शुरा दोघं एकत्र मुंबई विमानतळावर दिसले. खरंतर न्यू इयर साजरा करण्यासोबतच हनीमूनसाठी ते दोघं बाहेर गेले होते. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडीओत त्या दोघांनी हात पकडला आहे तर त्यावरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं.
अरबाज आणि शुराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघं मुंबई विमानतळावरून बाहेर येत असल्याचे दिसत आहे. तर अरबाज आणि शुरानं हात पकडला आहे. तर शुरा या व्हिडीओत पूर्णवेळ मान खाली करून चालत असल्याचे दिसते. अरबाजनं पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. तर, शुरानं ऑल ब्लॅक लूक केला आहे. तर तिच्या हातात गुलाबी रंगाचं जॅकेट आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ही पत्नी कमी आणि मुलगी जास्त वाटते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'किती दिवस ही पत्नी बनून राहणार.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'भाऊ, ही तर बहीण किंवा मुलगी... पत्नी कोणत्याच अॅंगलनं दिसत नाही.' आणखी एक नेटकरी मलायकाचा उल्लेख करत म्हणाला, 'मलायका मॅमला हे बघून इर्शा होणार नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मलायकाची जागा दुसरं कोणी घेऊच शकत नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बाप आणि लेक दिसतात.' तर अनेक नेटकऱ्यांनी मलायका आणि शुरामध्ये साम्य आहे.
हेही वाचा : मलायका अर्जुनचा ब्रेकअप? लग्नासाठी तयार नसल्यानं घेतला निर्णय!
अरबाजच्या या दुसऱ्या लग्नाच्या निर्णयानं सगळ्यांना आश्चर्य झाले होते. त्याचं कारण म्हणजे मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज हा जॉर्जियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर अचानक अरबाजनं शुराशी लग्न केलं. त्यांचा विवाह हा बहीण अर्पिता खानच्या घरी झाला. त्यावेळी कुटूंबातील जवळचे लोक आणि काही मित्र उपस्थित होते. लग्नाच्या 5 दिवस आधी अरबाजनं शुराला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्याचा व्हिडीओ शुरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता.