Malaika Arora-Arjun Kapoor Breakup : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. या वयातही मलायकानं स्वत: ला जसं मेनटेन केलं आहे ते आश्चर्यकारक आहे. मलायकाविषयी बोलायचं झालं तर ती कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचं आणि अर्जुन कपूरचं रिलेशनशिप हे टॉक ऑफ द टाऊन आहे. ते दोघे कुठेही स्पॉट झाले किंवा त्यांनी पोस्ट शेअर केली तरी त्याची चर्चा होते. मात्र, आता असे म्हटले जातं की त्या दोघांचा ब्रेकअप झाला आहे. त्याचं कारण देखील समोर आल्याचे म्हटले जात आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, अर्जुन आणि मलायकाचा ब्रेकअप झाला आहे. अर्जुन आणि मलायका हे एकमेकांशी खूप लॉयल आहेत. पण काही काळापूर्वी त्या दोघांपैकी एकाला लग्न करायचे होते. मात्र, दुसऱ्याला लग्न करायचं नाही (थोडक्यात ती व्यक्ती लग्नासाठी तयार नव्हती.) लग्न करण्यास तयार नसल्यानं दोघांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांचं नातं पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका किंवा अर्जुन कोणीही दुजोरा दिलेला नाही. मात्र, ख्रिसमस आणि न्यू इयरच्या दिवशी ते दोघं एकत्र स्पॉट झाले होते. काही काळापूर्वी मलायकानं 'झलक दिखलाजा'च्या स्टेजवर जाहिर केले की ती दुसरं लग्न करण्यासाठी तयार आहे. आता मलायका आणि अर्जुनसोबत आहेत की नाही हे ते दोघे स्वत: सांगू शकतात.
दरम्यान, ही पहिली वेळ नाही जेव्हा त्या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. या आधी अनेकदा त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. असं देखील म्हटलं जात आहे की अर्जुन कपूर हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कुशा कपिलासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यावर कुशा कपिलनं तिची प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की ती आणि अर्जुन रिलेशनशिप नाही किंवा एकमेकांना डेटही करत नाहीत. यानंतर मलायका आणि अर्जुन एकत्र स्पॉट झाले होते. त्यांच्या या कृतीनं एक गोष्ट समोर आली होती की ते दोघं विभक्त झाले नाहीत.
हेही वाचा : 'नको यांना या मुलींना धंद्याला लावू..', '..एवढी तरी अक्कल..'; गौतमीच्या 'त्या' कृतीने चाहत्यांचा संताप
मलायकाच्या पहिल्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर लग्नाच्या 18 वर्षांनंतर तिनं आणि अरबाजनं घटस्फोट घेतला. तर त्यांचा एक मुलगा असून अरहान असं त्याचं नावं आहे. अरहान हा 21 वर्षांचा आहे. ते दोघं मिळून त्याचा सांभाळ करतात.