घटस्फोटाच्या २ वर्षानंतर अरबाज खान `ही`च्या सोबत पुन्हा प्रेमात...
अरबाज खानचं नवं प्रेमप्रकरण...
मुंबई : अरबाज खान गेल्या काही दिवसांपासून IPL सट्टेबाजीमुळे चर्चेत होता. पण आता तो त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. ४ ऑगस्टला अरबाज खानचा ५१ वा वाढदिवस होता. हे बर्थडे सेलिब्रेशन अरबाजने गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत केले.
वृत्तानुसार, अरबाज आणि जॉर्जिया रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. पण पहिल्यांदाच जॉर्जियाने सोशल मीडियावर अरबाजसोबतचा फोटो शेअर केला.
अरबाजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जॉर्जियाने हा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, आजचा दिवस तुमचा आहे. हॅप्पी हॅप्पी बर्थडे रॉकस्टार. यात तिने अरबाजला टॅग करत भावना व्यक्त करण्यासाठी लव्ह इमोजीचा वापर केला.
याशिवाय जॉर्जियाने अरबाजसोबतचा फोटो इंस्टाग्रामवरही शेअर केला. अरबाजने दोन वर्षांपूर्वी पत्नी मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतला. पण त्यानंतरही दोन्ही मुलांसोबत अरबाज-मलायका आऊटींगसाठी जात असतात.
यापूर्वी अरबाजचे नाव एलेक्जेंड्रिया नावाच्या मुलीशीही जोडले गेले होते. त्या दोघांचेही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.