नवी दिल्ली : नवज्योत सिंग सिद्धू यांचा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर आता ते पुन्हा कपिल शर्मा शोमध्ये परतणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. यावरून अनेक मीम्स देखील तयार झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे. यामुळे आता अर्चना पुरण सिंहची जागा आता धोक्यात येणार असल्याचं नेटकरी सांगत आहेत. 


निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सिद्धू आता कपिलच्या शोमध्ये परतणार असल्याची चर्चा होत आहे. अर्चना पूरण सिंह यांची खुर्ची धोक्यात आली आहे. या व्हायरल मीमवर अर्चना पूरण सिंह यांनी मौन सोडलं आहे. 


या सगळ्यावर अखेर अर्चना पुरण सिंह यांनी मौन सोडलं आहे. त्या म्हणाल्या की मला हे सगळंच खूप विचित्र वाटत आहे. काहीही घडलं तरी माझ्यावर मीम्स केले जातात. कपिलच्या शोमध्ये खुर्चीवर बसून हसण्याशिवाय माझ्याकडे दुसरं कोणतंही काम नाही असंच लोकांना वाटतं. 


नवज्योत सिंग सिद्धूने 'द कपिल शर्मा शो'मध्ये यायचे ठरवले तर मी शोमधून बाहेर पडायला तयार आहे असंही यावेळी अर्चना पुरण सिंह म्हणाल्या आहेत. 


मीम्स व्हायरल होणं ही माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. त्यामुळे अशा लोकांची पर्वा करणं सोडलं आहे. मी राजकारणात जाण्याचा कधीही विचार केला नाही. पण जेव्हा जेव्हा सिद्धू यांच्याशी संबंधीत काही घडतं तेव्हा ती गोष्ट माझ्या या शोमधील खुर्चीसोबत रिलेट केली जाते जे खूप जास्त विचित्र आहे. 


'द कपिल शर्मा शो'च्या खुर्चीवर नेहमी बसणार नाही, पण सोशल मीडियावर लोक असे वागतात की माझ्याकडे फक्त हे काम आहे. मला दुसरं कामच मिळणार नाही असं त्यांना वाटतं. सिद्धू यांनी जर शोमध्ये परतण्याचा निर्णय घेतला तर मी हा शो सोडेन आणि दुसऱ्या प्रोजेक्टकडे लक्ष देईन असंही परखड उत्तर अर्चना यांनी दिलं आहे.