Kolkata Rape Case : कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार प्रकरणात सोशल मीडियावर अजूनही सगळीकडून संताप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात बॉलिवूड सेलिब्रिटी देखील समोर येत आहेत. त्यात जॉन अब्राहमनं तर थेट मुलांना चेतावनी दिली की मुलांनो सुधरा. आता लोकप्रिय गायक अरिजीत सिंगनं या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. इतकंच नाही तर त्यासाठी एक खास गाणं देखील त्यानं सादर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता बलात्कार आणि मर्डर प्रकरणातून लोकांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशात या प्रकरणाला घेऊन लोक न्याय मिळावा ही मागणी करत आहेत. अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी करत संताप व्यक्त केला आहे. कोलकाताच्या के हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरसोबत झालेल्या या घटनेवर न्याय मिळावा यासाठी अरिजीतनं एक नवं गाणं प्रदर्शित केलं आहे. 



सध्या समोर आलेल्या या गाण्यात अरिजीत सिंगनं त्याच्या यूट्यूब चॅनलवरून हे गाणं शेअर केलं आहे. अरिजीतनं हे गाणं कंपोज केलं असून त्यानेच लिहिलंय आणि गायलं देखील आहे. या गाण्याचं नाव 'आर कोबे' आहे. या पूर्ण गाण्याचा व्हिडीओमध्ये हाताची मुठ दिसत आहे. या गाण्यात दिसत असलेल्या हाताचं मनगटावरच हे गाणं आहे. यात अरिजीतनं लिहिलं की हे गाणं फक्त प्रोटेस्ट सॉन्ग नाही. हे कारवाईचं आव्हान आहे. 


हेही वाचा : पहिल्या बाळाच्या जन्मानंतर 119 कोटींच्या आलिशान घरात शिफ्ट होणार दीपिका-रणवीर! झाले SRK चे शेजारी


व्हायरल होत असलेल्या अरिजीत सिंगच्या या गाण्यावर लोक त्यांची प्रतिकिया देत आहेत. सोशल मीडियावर काही लोकं अरिजीत सिंगची स्तुती करत आहेत. तर काही लोक त्याला ट्रोल करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'रेव्होल्युशनचं एक नवं गाणं, न्यायसाठी असलेला आवाज, समानतेची मागणी.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुझ्या लोकप्रियतेचा आणि तुझ्या प्लॅटफॉर्मचा इतक्या चांगल्या पद्धतीनं वापर केल्यानं सगळ्यात आधी त्यासाठी आभार. तू जे काही केलंस ते सगळ्यात चांगलं काम आहे. आम्हाला तुमच्यासारखे आणखी लोक हवे आहेत जे घडलेल्या घटनेवर कोणत्याही गोष्टीची परवाह न करतो बोलतात.' दुसरीकडे ट्रोलर्सचं म्हणणं आहे की या सगळ्या घटनेवर गाणं घेऊन येण्यासाठी अरिजीत सिंगला इतका वेळ का लागला असा सवाल केला आहे.