पहिल्या बाळाच्या जन्मानंतर 119 कोटींच्या आलिशान घरात शिफ्ट होणार दीपिका-रणवीर! झाले SRK चे शेजारी

Deepika and Ranveer Will Shift To This Home : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बाळाच्या जन्मानंतर या नव्या घरात होणार शिफ्ट...

दिक्षा पाटील | Updated: Aug 29, 2024, 02:21 PM IST
पहिल्या बाळाच्या जन्मानंतर 119 कोटींच्या आलिशान घरात शिफ्ट होणार दीपिका-रणवीर! झाले SRK चे शेजारी title=
(Photo Credit : Social Media)

Deepika and Ranveer Will Shift To This Home : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोणच्या नव्या घराचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. ते ज्या बिल्डिंगमध्ये राहायला जाणार आहेत त्याचा नवा व्हिडीओ हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही बिल्डिंग शाहरुख खानच्या 'मन्नत' या घराच्या बऱ्याच जवळ आहे आणि मुंबईतील सगळ्यात पॉश आणि उच्चभ्रू वस्तीमध्ये आहे. रणवीर आणि दीपिकानं दोन वर्षांपूर्वी बिल्डिंगमध्ये अपार्टमेंट बूक केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या या घराचं काम सुरु होतं. आता दीपिका सप्टेंबरमध्ये तिच्या बाळाला जन्म दिल्यानंतर ती या घरात जाणार असल्याचं म्हटलं जातं आहे. 

सोशल मीडियावर त्या बिल्डिंगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला आहे की ती संपूर्ण बिल्डिंग ही त्यांचीच आहे का? दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचं हे नवं घर वांद्रेमध्ये आहे. शाहरुख खानच्या 'मन्नत' च्या अगदी पाठीच ही बिल्डिंग आहे. तिच्या घरातून समुद्राचा सुंदर असा व्ह्यू देखील पाहायला मिळणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं हा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. या व्हायरल व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'संपूर्ण बिल्डिंग त्यांची आहे?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हे फक्त 3 लोकांसाठी असलेलं घर आहे?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'SRK चे शेजारी झाले!' 

रिपोर्ट्सनुसार, दीपिका आणि रणवीरनं या अपार्टमेंटसाठी 118.94 कोटींची रक्कम मोजली आहे. त्यासोबत रजिस्ट्रेशनसाठी स्टॅंप ड्यूटीमध्ये 7.13 कोटी मोजले आहेत. या घराला टेरेस एरिया सोडून प्रति स्क्वेअर फूटची किंमत ही 1.05 लाख रुपये आहे. या प्रॉपर्टीमध्ये सगळ्या सुविधा आहेत. त्यात खासगी जीम, स्विमिंग पूल, एन्टरटेन्मेंट स्पेस देखील आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्याचा विचार करून बनवण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा : 'अविवाहीत मुली आई-वडिलांवर ओझं...'; KBC मधील स्पर्धकाचं बोलणं ऐकताच अमिताभ म्हणाले 'मुली तर...'

दीपिका आणि रणवीरनं 29 फेब्रुवारी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली होती. त्यात तिनं म्हटलं होतं की सप्टेंबर महिन्यात ते दोघं त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. दीपिका त्यानंतर अनेक सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x