Arjun Kapoor and Anshula Kapoor Video : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बहिण अंशुला कपूरवर (Anshula Kapoor) खूप प्रेम करतो. एका मोठ्या भावाचं कर्तव्य तो चांगल्या प्रकारे पारपाडतो. अर्जुन बऱ्याच वेळा सोशल मीडियावर तिच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. अंशुला ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपूर्वी अंशुला तिनं कमी केलेल्या वजनामुळे चर्चेत आली होती. इतकी वर्षे फॅशन आणि कला क्षेत्रापासून लांब राहिल्यानंतर अंशुलानं अखेर कला क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अंशुलानं रॅम्प वॉक केला आहे. त्यावेळी ज्या प्रकारे अर्जुननं रिअॅक्शन दिली त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन आणि अंशुलाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत अंशुला ही सुरुवातीला रॅम्पवॉक करताना दिसते. तिला पाहताच अर्जुन जोरात टाळ्या वाजवू लागतो. त्यानंतर जेव्हा अंशुला बॅकस्टेजवर जाण्यासाठी वळते तेव्हा अर्जुन त्याच्या जागेवरून उठून उभा राहतो आणि अंशुलाला चिअर करू लागतो. यावेळी अर्जुन अंशुलाला फ्लाईंग किस देखील देतो. त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहता अनेकांनी कमेंट करत भावा-बहिणीची अशी जोडी असायला हवी असं म्हटलं आहे. (Anshula Ramp Walk)


हेही वाचा : Satish Kaushik यांच्या अभिनयाची अखेरची झलक 'या' वेबसीरिजमध्ये पाहता येणार!


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


फक्त अर्जुन कपूर नाही तर अभिनेत्री आणि अंशुलाची चुलत बहिण सोनम कपूरनं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मला तुझ्यावर गर्व आहे असे म्हटले होते. अर्जुन हा अंशुलापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. अर्जुननं अंशुलासोबतची लहानपणीची अनेक फोटो शेअर केली आहेत. दरम्यान, अंशुला व्यतिरिक्त या फॅशन वीकमध्ये सोनाक्षी सिन्हानं देखील हजेरी लावली होती. तर बहिण अंशुलाला ज्या प्रकारे अर्जुननं चिअर केले ते पाहून नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे. त्याच्या व्हिडीओवर कमेंट करत काही नेटकऱ्यांनी 'मला भाऊ का नाही' असे म्हटले आहे. जेव्हा तुमच्यासोबत तुमचा भाऊ असतो तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नसते.