Satish Kaushik यांच्या अभिनयाची अखेरची झलक 'या' वेबसीरिजमध्ये पाहता येणार!

Satish Kaushik यांचे 9 मार्च रोजी निधन झाले. सतीश कौशिक यांच्या निधनानं चाहत्यांना धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या आगामी वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही वेबसीरिज अखेरची ठरली आहे. सतीश कौशिक यांना मोठ्या पडद्यावर अखेरचं बघण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आणि भावूकही झाले आहेत. 

Updated: Mar 11, 2023, 10:18 AM IST
Satish Kaushik यांच्या अभिनयाची अखेरची झलक 'या' वेबसीरिजमध्ये पाहता येणार!  title=

Satish Kaushik Last Project : बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे 9 मार्च रोजी निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी सतीश यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्काबसला होता. त्यांनी कॉमेडीच्या मदतीनं सगळ्यांची मने जिंकली होती. विनोदाच्यावेळी बरोबर विनोद क्रॅक करण्यासाठी सतीश कौशिक ओळखले जात होते. दरम्यान, सतीश कौशिक यांनी अखेरचं काम केलेल्या Pop Kaun या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

सतीश कौशिक यांना या वेबसीरिजच्या माध्यमानं त्यांचे चाहते अखेरचं पडद्यावर पाहणार आहेत. या वेब सीरिजचे नाव (Pop Kaun) असे आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला पाहता ही वेब सीरिज आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करणार असल्याचे कळत आहे. या वेबसीरिजची पटकथा ही एका मुलाच्या आयुष्यावर आहे, ज्याला त्याच्या खऱ्या वडिलांविषयी माहित नाही. त्याचं लग्न ठरलं असताना तेही मोडलं जातं. इतकंच काय तर त्याच्या होणाऱ्या पत्नीचे वडील त्या मुलाला त्याच्या खऱ्या वडिलांना शोधण्यास सांगतो. यावेळी त्या मुलासोबत चार वेगवेगळे पुरुष येतात. पण अखेरपर्यंत नक्की त्याचे वडील कोण? हा प्रश्न सुटत नाही. या सगळ्या प्रकरणामुळे सतीश कौशिक यांच्या आयुष्यात खूप गोंधळ उडतो. (Satish Kaushik Last Project) 

हेही वाचा : मानधनाच्या बाबतीतही 'झुकेगा नही साला...' 'पुष्पा 2' साठी Allu Arjun च्या Fees ची आकडेवारी पाहिली का?

सतीश कौशिक यांना अखेरचं कोणत्या प्रोजेक्टमध्ये पाहणार असल्यानं त्यांचे चाहते भावूक झाले आहेत. अनेकांनी चित्रपटाच्या ट्रेलरवर कमेंट करत तुमची खूप आठवण येते असं सतीश यांच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत सांगितले की सतीश कौशिक यांच्या चाहत्यांकडून वेब सीरिजच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. 

पाहा ट्रेलर - 

या ट्रेलरवरून ही एक कॉमेडी वेबसीरिज आहे हे कळतं आहे. यावेळी ज्या मुलाचा हा संपूर्ण गोंधळ उडत आहे. त्या मुलाची भूमिका अभिनेता कुणाल खेमू साकारत आहे. दरम्यान, या वेब सीरिजमध्ये राजपाल यादव, नुपूर सॅनन, जॉनी लीव्हर, सौरभ शुक्ला आणि सतीश कौशिक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. फरहाद सामजी यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. ही वेब सीरिज 17 मार्च रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.