मुंबई : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान सध्या आपल्या कुटुंबासोबत व्यस्त आहे. करीना सध्या खूपच कमी सिनेमे साईन करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना खूप विचार करुन आता सिनेमे साईन करत आहे. आता ती आशुतोष गोवारीकर यांच्या सिनेमात दिसू शकते. करीनाने आशुतोष यांची भेट घेतली. आशुतोष मराठी सिनेमा 'आपला माणूस' या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवणार आहेत. आता यामध्ये माहिती अशी आहे की, या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर असणार आहे.


अर्जुन-करीना पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. की अँड का सिनेमानंतर दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. अजय देवगन या सिनेमामध्ये असेल असं देखील बोललं जात होतं. पण आता अर्जुन कपूरच्या नावाची चर्चा आहे. अर्जुन सोबतच अजयच्या जोडीला देखील पंसती मिळाली होती. 


नाना पाटेकर, इरावती हर्षे आणि सुमित राघवन आपला माणूस या मराठी सिनेमामध्ये लीड रोलमध्ये होते. हा सिनेमा अजय देवगन याने प्रोड्यूस केला होता.