मुंबई : अरबाज खानची घटस्फोटीत पत्नी मलायका अरोरा खान आणि तिचा आताचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यांच्या लग्नाची जोरदार रंगली आहे. आता हे दोघं खूप ठिकाणी एकत्र पाहायला मिळतात. मलायकाचा वाढदिवस या दोघांनी परदेशात साजरा केल्याचं कळतं. एअरपोर्टवर तसं त्यांना एकत्र पाहण्यात आलं. आता हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. आतापर्यंत हे दोघं कधीच लग्नाबद्दल काहीही बोललेले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता या दोघांच लग्न कधी होणार? आणि कधी होऊ शकतं? याची चर्चा मीडियामध्ये सुरू झाली आहेत. या दोघांना कायमच एकमेकांसोबत वेळ घालवताना पाहिलं आहे. दिवाळीच्या एक दिवस अगोदरही हे दोघं एकमेकांच्या हातात हात घालून डिनर डेटला गेल्याचे फोटो आहेत. 


आतापर्यंत हे दोघं कधीच आपल्यानात्याबद्दल मोकळेपणाने बोललेले नाहीत. मात्र आता ते लवकरच आपल्या प्रेमाचा आणि नात्याचा खुलासा करतील. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले हे कपल खूप जवळ येताना दिसत आहेत. आता अशी माहिती मिळते की, हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. याची घोषणा हे दोघं करतील. 


आता हाती आलेल्या माहितीनुसार हे दोघं 2019 मध्ये लग्न करणार आहे. 2019 च्या एप्रिल महिन्यात लग्न करणार आहेत. तसेच आता त्यांच्या लग्नाची तारीख देखील ठरवणार आहेत. 


करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या सहाव्या आठवड्यात अर्जुन कपूर आला होता. तेव्हा मलायका अरोराला गेस्ट म्हणून बोलवलं होतं. तेव्हा मलायकासोबत लग्न करणार असल्याचे संकेत अर्जुनने दिले आहेत. यावर मलायका लाजताना दिसत होती. मलायकाने गेल्यावर्षी अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला आहे.