मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनाचं  सावट वाढताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी कोरोना पॉझिटीव्ह असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor ) कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे.  अर्जुन कपूरसोबतच त्याची बहीण अंशुला कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. पण आता अर्जुन कपूरसोबत पार्ट्यांमध्ये एकत्र दिसणारी मलायका अरोरा ही अडचणीत सापडली आहे. मलायाकावर देखील कोरोनाचं सावट वाढण्याची शक्यता  असल्याचं बोललं जातं आहे.


सुपरस्टार अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आणि पती करण बुलानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनी स्वतःला वेगळे केले आहे. ही माहिती त्यांनी सोशल मीडियावर सर्वांना दिली आहे. दोघांनी यावर्षी 14 ऑगस्ट रोजी अनिल कपूरच्या जुहू येथील बंगल्यात लग्न केले.


रिया कपूरसोबतच बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांनाही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत लवकरच अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे.



BMC ने याच्या काही वेळापूर्वी जुहू येथील अर्जुन कपूरच्या रहेजा ऑर्किड बिल्डिंगच्या बाहेर कोरोना चेतावणी देणारा बोर्ड लावून इमारत सील करण्याची माहिती पोस्ट केली होती.ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जुन कपूर रिया कपूरच्या घरी पोहोचला होता.



अलीकडेच कपूर कुटुंबीय ख्रिसमसच्या निमित्ताने भरपूर पार्टी करताना दिसले. मात्र, अर्जुन कपूरला कोरोना होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अर्जुन मलायकाला ( arjun kapoor and malaika ) कोरोना झाला होता.