मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor)  हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अर्जुन हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि मलायकाचा ब्रेकअप झाला या बातमीमुळे चर्चेत होता. पण त्या दोघांना ब्रेकअप झाला नाही. दरम्यान, आता अर्जुन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अर्जुनचा एक व्हि़ीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत अर्जुन रागात असल्याचे दिसतं आहे. सध्या अर्जुन 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहे. यात त्याला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
अर्जुनचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुननं लाल आणि काळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट परिधान केला आहे. तर अर्जुनला पाहताच, पापाराझी आणि त्याचे चाहते त्याचे फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. हे पाहून अर्जुन परिस्थिती हाताळताना दिसला कारण हा रस्ता खूप वर्दळीचा होता आणि त्यामुळे अपघाताची भीती होती.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


समोर आलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की अर्जुन यावेळी त्याच्या चाहत्यांना आणि पापाराझींना सांभाळताना दिसतो. त्यानंतर अर्जुन बोलतो, तुम्ही लोक करता आणि आमचे नाव खराब आहे. रस्त्यावर यामुळे गर्दी होते आणि ट्राफिक होणार. कोणत्याही सेलेब्सच्या उपस्थितीत गर्दी जमली आणि त्या गर्दीत अपघात झाला, तर लोक गर्दीचा नव्हते तर सेलिब्रिटींचा दोघ सांगतात. त्यामुळे अर्जुननं सगळं काही उत्तम प्रकारे सांभाळलं आणि चाहत्यांसोबत फोटो काढला. 


अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याने ज्या प्रकारे सगळी परिस्थिती सांभाळली त्याचं कौतुक होतं आहे. अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स' लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया देखील दिसणार आहेत. याशिवाय तो 'कुत्ते' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत राधिका मदान, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही भूमिका आहेत. पुढे, अर्जुन आसमान  भारद्वाजच्या अनटोल्ड आणि अजय बहलच्या 'द लेडी किलर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर दिसणार आहे.