मुंबई : 'इश्कजादे' सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेली जोडी 'नमस्ते इंग्लंड' या सिनेमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालायला सज्ज झालीय. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. या दोघांना तब्बल सात वर्षानंतर एकमेकांसोबत पाहण्याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सलाही लागून राहिलीय. त्यामुळेच हा व्हिडिओ ट्रेलर यूट्युबवर ट्रेन्ड होताना दिसतोय. प्रदर्शित झाल्यानंतर आत्तापर्यंत हा व्हिडिओ 15 करोडहून अधिक वेळा पाहण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलींचं स्वातंत्र्य आणि प्रेमावर 'नमस्ते इंग्लंड' हा सिनेमा आधारलेला आहे. अर्जुनशी विवाह केल्यानंतरही रानी अर्थात परिणीती इंग्लंडला निघून जाते... आणि तिला परत आणण्यासाठी अर्जुनही तिच्या मागे जातो... आता हे दोघे पुन्हा भारतात येतात का? आणि कसे? ते जाणून घेण्यसाठी आपल्याला सिनेमा पाहावा लागेल.