मुंबई : अभिनेता अर्जुन कपूरने कोरोनावर मात केली आहे. तब्बल ३० दिवसांनी त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून आपली भावना व्यक्त केली आहे. अर्जुनने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करून त्याला आराम करण्याची विनंती केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन कपूरने चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आपला कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं तो म्हणतो. मला आता बरं वाटतं आहे. हा व्हायरस गंभीर यासाठी आहे कारण मी विनंती करतो की, याला तुम्ही गंभीर स्वरुपात घ्या. कोरोनाचा प्रभाव ज्येष्ठ नागरिकांवर आणि लहानांवर दोघांवरही होतो. त्यामुळे आपली काळजी घ्या आणि मास्कचा वापर करा.  



‘मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की माझी करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. मला आता बरे वाटते आणि पुन्हा शुटींग सुरु करण्यासाठी मी उत्सुक आहे. तुम्ही दिलेल्या सकारात्मक शुभेच्छांसाठी तुमचे खूप खूप आभार. हा व्हायरस खूप भयानक आहे त्यामुळे सगळ्यांनी कृपया काळजी घ्या’ असे म्हटले आहे.