मुंबई : वर्षभरापूर्वी 'अर्जुन पटियाला' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. अखेर आज या बहुचर्चित चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'अर्जुन पटियाला' चित्रपटातून दिलजीत दोसांझ, वरुण शर्मा आणि क्रिती सेनन प्रमुख भूमिका साकारणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोस्टरमधून दिलजीत दोसांझ, वरुण शर्मा आणि क्रिती सेनन अनोख्या अंदाजात दिसत आहेत. पोस्टरमधून क्रिती सेनन 'रितू' हे पात्र साकारत असून ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसतेय. तर दिलजीत दोसांझ 'अर्जुन' आणि वरुण शर्मा 'ओनिडा' हे पात्र साकारताना दिसणार आहेत.




रोहित जुगराज दिग्दर्शित 'अर्जुन पटियाला' कॉमेडी चित्रपट आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, दिनेश विजान आणि संदीप लेजेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'अर्जुन पटियाला'च्या पोस्टरमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. 



दिलजीत दोसांझने २०१६ मध्ये 'उडता पंजाब' चित्रपटातून बॉलिवू़डमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने 'फिलोरी', 'वेलकम टू न्यूयॉर्क', 'सूरमा' यांसारख्या चित्रपटातूनही भूमिका साकारली होती. 


दिलजीत दोसांझ 'अर्जुन पटियाला'नंतर करिना कपूर खान आणि अक्षय कुमार स्टारर 'गुड न्यूज'मध्येही भूमिका साकारणार आहे.


येत्या २६ जुलै रोजी  'अर्जुन पटियाला' प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी कंगना रनौत आणि राजकुमार राव यांचा 'मेंटल है क्या' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.