मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल गेल्या काही दिवसांपासून आपल्या अभिनय - मॉडेलिंग क्षेत्रामुळे नाही रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालने आपली गर्भवती गर्लफ्रेंड गॅबेरिला हिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पोस्ट करत त्याने आपण तिसऱ्यांदा बाप होणार असल्याची बातमी दिली होती. त्यावर आता अर्जुन रामपालची पूर्व पत्नी मेहर जेसिया हिची प्रतिक्रिया समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन रामपाल आणि गर्लफ्रेंड गॅबेरिलाने त्यांच्या नात्याबाबत नुकताच खुलासा केला आहे. परंतु गॅबेरिला लग्नापूर्वीच गर्भवती असल्यानं हे कपल चर्चेत आहे. दोघांचा फोटो शेअर करत अर्जुननं ही गुडन्यूज दिली होती.


 



गॅबेरिला ही सहा महिन्यांची गर्भवती आहे. परंतु, ही गोष्ट अद्याप दोघांनीही गुलदस्त्यात ठेवणंच पसंत केलं होतं. काही दिवसांपूर्वी दोघांनी आपली ही 'गुड न्यूज' सोशल मीडियाद्वारे त्यांच्या फॅन्सना दिली. अर्जुनच्या या पोस्टमुळेच अर्जुनच्या मुली आणि पूर्व पत्नी मेहर यांच्यापर्यंत ही बातमी पोहचली. आत्तापर्यंत मेहर आणि तिच्या मुलींनाही या गोष्टीची कल्पना नव्हती. 


परंतु ही बाबत समजल्यानंतरही मेहर जेसियाची प्रतिक्रिया अतिशय सकारात्मक असलेली दिसली. 'बॉलिवूड लाइफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, मेहरला जेव्हा गॅबेरिलाच्या प्रेग्नन्सीबाबत समजलं त्यावेळी तिने या गोष्टीला सकारात्मकपणे घेतली. अर्जुन आपल्या आयुष्यात पुढे गेला असल्याचं तिने मान्य केलं आहे. मेहरच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे की, मेहर एक उत्तम आई आहे आणि ती मुलींसाठी सर्वोत्तम असणाऱ्या सर्व गोष्टी करण्याकडे लक्ष देते. मेहरला या अशा गोष्टींमुळे काही फरक पडत नाही, ती केवळ तिच्या मुलींकडे लक्ष देत असून त्यांची देखभाल चांगल्या प्रकारे करु इच्छिते, असंदेखील यात म्हटलं गेलंय.



गेल्या वर्षी अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिका यांनी आपले २० वर्षांचं नातं तोडत घटस्फोट घेतला होता. परंतु अर्जुनची त्याच्या मुलींशी अतिशय जवळिक आहे. त्यामुळे त्याच्या दोन्ही मुली माहिका आणि मायरा नेहमीच अर्जुनसोबत पाहयला मिळतात. अर्जुनच्या मुली नेहमी मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर असतात.



 


गॅबरिला दक्षिण अफ्रिकी मॉडेल आहे. २००९ मध्ये मीस इंडियन प्रीमियर लीगमध्ये तीने भाग घेतला होता. जगातील १०० सेक्सी महिलांमध्ये गॅबेरिलाची निवड करण्यात आली होती. 'मिस IPL बॉलिवूड' हा किताब पटकावल्यानंतर गॅबेरिलाला खरी ओळख मिळाली. तीने आयपीएल टीम डेक्कन चार्जर्सला रिप्रेजेंट केलं आहे. तसंच तिने काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्यही काम केलं आहे.