अरबाज आणि मलायकाच्या लग्नाबद्दल अर्जुनकडून मोठा खुलासा
अर्जुन आणि मलायकाने त्यांच्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे.
मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी 'सरदार का ग्रँडसन' (Sardar Ka Grandson) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कोणताही क्षण असो अर्जुनला त्याच्या आणि अभिनेत्री मलायका अरोराच्या नात्याबद्दल विचारलं जातं. शिवाय त्यांना अनेक ठिकाणी एकत्र देखील स्पॉट केलं जातं. त्याचप्रमाणे दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुलीही दिली आहे. चित्रपटासंबंधी मुलाखतीत त्याला मलायकाच्या भूतकाळाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
मुलाखतीत जेव्हा अर्जुनला मलायकाच्या भूतकाळाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, 'मला कोणाच्या खासगी आयुष्यावर बोलायला बिलकूल आवडतं नाही.' शिवाय एका नात्यात आपल्या जोडीदाराचा आदर करणं अत्यंत गरजेचं असतं. असं म्हणत कोणत्याही नात्यात आदर असलाचं पाहिजे असं त्याने सांगितलं.
अर्जुन पुढे म्हणाला, 'प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. जेव्हा सर्व गोष्टी बाहेर येतात, तेव्हा काही वेळा ते बिलकूल ठिक नसतं. नात्यामुळे सर्वात जास्त प्रभावित मुलं होतात. मी नेहमी प्रयत्न करतो आमच्या नात्यात एकमेकांप्रती सन्मान आणि आदराची भावना असावी. नात्यामुळे माझं करियर प्रभावित होणार नाही याची देखील मी काळजी घेतो.'
'कोणत्याही नात्यात एक सीमा निर्धारित करण्याची गरज आसते. मी आणि मलायका आमच्या नात्याला वेळ देतो.' असं देखील अर्जुन म्हणाला. अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरचं अभिनेत्री रकुलरप्रीत सिंगसोबत 'सरदार ऑफग्रँडसन' चित्रपटात झळकणार आहे. त्याशिवाय अर्जुन 'भूत पुलिस' आणि वो 'एक विलेन रिटर्न' या चित्रपटांमध्ये देखील झळकणार आहे.