रणबीर कपूरच्या वाढदिवशी अर्जुनची आलियाला ही विनंती; फोटो व्हायरल
अर्जुनची अशी विनंती मान्य करेल आलिया भट्ट; गर्लफ्रेन्डचा निर्णय पटेल रणबीर कपूरला?
मुंबई : नुकताचं अभिनेता रणबीर कपूरने 39वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. वाढदिवसाचं औचित्य साधत त्याला चाहते, कुटुंब, मित्र परिवाराकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत. रणबीर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसला तरी वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षांव होत आहे. पण या शुभेच्छांमध्ये अभिनेता अर्जुन कपूरची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. अर्जुनने ही पोस्ट मित्र रणबीरसाठी केली मात्र आलियाकडे एक विनंती केली आहे. त्यामुळे आता आलिया अर्जुनची विनंती मान्य करेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजुनने रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक जुना फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये, 'हा फोटो पाहून मला असं वाटतं की बर्थडे बॉयसोबत मला आणखी फोटो क्लिक करण्याची गरज आहे. त्यामुळे आलिया भट्टने माझी मदत करायला हवी... ' आता आलियाने जर अर्जुनची विनंती मान्य केली तर रणबीरला आलियाचा निर्णय आवडेल का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील प्रेमाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही अनेकवेळा समोर आल्या आहेत, पण आतापर्यंत आलिया भट्टने सोशल मीडियावर उघडपणे तिच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. आता आलिया भट्टने पहिल्यांदाच फक्त रणबीर कपूरसोबत तिचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे.