मुंबई : बॉलिवूडमधून अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता अरमान कोहलीचा छोटा भाऊ आणि लोकप्रिय निर्माता-दिग्दर्शक राजकुमार कोहलीचे यांचा छोटा मुलगा यांचे निधन झाले आहेत. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार रजनीश कोहली यांचे निधन किडनी फेल झाल्यामुळे मुंबईत झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Armaan Kohli Brother Rajnish Kohli Passes Away)वयाच्या 44 व्या वर्षी रजनीश यांनी अखेरचा श्वास घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीश कोहली यांची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रजनीश हे शारीरिकदृष्ट्या विकलांग असून चालण्या फिरण्यास असमर्थ होते. 



रजनीश यांना कायमच व्हिलचेअरची मदत लागत असे. बराच काळ ते घरीच असायचं. रजनीश यांचा वयाच्या 14 व्या वर्षी एक अपघात झाला त्यामध्ये त्यांना विकलांगपणा आला. रजनीश यांचे वडिल राजकुमार कोहली हिंदी सिनेमातील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता होते.  राजकुमार यांनी 70-80 च्या दशकात सुपरहिट सिनेमे दिले. 'जानी दुश्मन', 'नागिन' , 'नौकर बीवी का', 'राज तिलक'  यासारख्या सिनेमांचा सहभाग आहे. 



राजकुमार कोहली यांनी आपल्या मोठ्या मुलाला अरमान कोहलीला 1992 मध्ये 'विरोधी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून आणलं. ते पुन्हा एकदा 'बिग बॉस 7' स्पर्धक म्हणून चर्चेत आले. अरमान कोहली आपला लहान भाऊ रजनीश कोहलीची खूप काळजी घेत. मनापासून त्यांच्यावर प्रेम करतं.