Armaan Malik's Wife Kritika Malik Bought New House : यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याच्या दोन पत्नी आहेत पहिल्या पत्नीचे नाव कृतिका मलिक (Kritika Malik) आणि दुसऱ्या पत्नीचे नाव पायल मलिक (Payal Malik) असे आहे. ते सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. सगळ्यात आधी अरमान दोन पत्नी आहेत म्हणून चर्चेत आला होता. तर त्यानंतर अरमान हा त्याच्या दोघी पत्नी एकाच वेळी प्रेग्नंट झाल्या या बातमीमुळे चर्चेत आला. कृतिका आणि पायल या दोघांमध्ये नेहमीच भांडण होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी त्या भांडतही नसतात मात्र, सोशल मीडियावर अशा खोट्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. दरम्यान, अरमानच्या दुसऱ्या पत्नीनं एक व्लॉग शेअर करत तिच्या आलिशान घराची झलक दाखवली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृतिकानं युट्यूबवर तिचा एक व्लॉग शेअर केला आहे. या व्हिडीओत ती बोलते की तिचं आणि पायलचं मोठं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. कृतिका बोलते की तिनं तिचं ड्रीम होम विकत घेतलं आहे. या व्हिडीओत कृतिका आनंदी असल्याचे दिसत असून तिला तिचं आलिशान महाल मिळालं आहे. कृतिका या व्लॉगमध्ये तिच्या घराची होम टूर करते. सुरुवातीला घराच्या बाहेरून ती संपूर्ण घराविषयी थोडी माहिती देते. त्यानंतर लिव्हिंग रुमपासून किचन ते बेडरूमपर्यंत सगळं दाखवते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कृतिकानं हा व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली तेव्हा सगळ्यांना वाटलं की तिनं स्वत: घर खरेदी केलं. संपूर्ण घराची टूर केल्यानंतर कृतिकान खुलासा केला की ते इथे फक्त शूटिंगसाठी पोहोचले आहेत. हे त्यांचं घर नाही.


हेही वाचा : ती हे सगळं पैशासाठी करते; Nawazuddin Siddiqui नं सोडलं मौन


अरमानची पहिली पत्नी पायलला जुळी मुलं होणार आहेत. तर कृतिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की पायलच्या दोन्ही मुलांचे जन्मानंतर निधन झाले. त्यानंतर अनेकांनी त्यावर शोक व्यक्त केला. त्या बातमीवर कृतिकानं उत्तर दिलं होतं. कृतिका ही नॅचुरली प्रेग्नंट आहे तर पायल IVF च्या मदतीनं प्रेग्नंट आहे. अरमानन आणि पायलला एक मुलगा आहे.  



अरमान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता. मात्र, अरमाननं त्याच्या दोन्ही पत्नींसोबत केलेला हा प्रॅंक होता. अरमान मलिक हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. अरमानचे लाखो फॉलोवर्स आहेत. अरमाननं 2011 साली पायलशी लग्न केलं होतं. त्यानंतर 2018 साली त्यानं पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकाशी लग्न केलं. या दोघी अरमानसोबत एकाच घरात राहतात.