मुंबई : 'बिग बॉस' फेम अर्शी खान सहसा तिच्या चाहत्यांच्या हृदय जिंकणाऱ्या व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असते. अर्शीची स्टाईल दररोज हेडलाईनमध्ये असते. पण आता असं काहीसं घडलं आहे की, अभिनेत्रीचा राग चर्चेत आहे, कारण तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती काही लोकांवर रागावताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणपतीची पूजा केल्यानंतर अर्शी अडकली
खरं तर, आदल्या दिवशी, अर्शीने गणपती पूजेचे फोटो शेअर केले होते, ज्याच्या कमेंटमध्ये काही लोकांनी तिला इस्लामचा धडा शिकवला होता. आता अर्शीने व्हिडिओ शेअर करून अशा लोकांचा क्लास घेतला आहे. आदल्या दिवशी तिच्या मित्रांसोबत गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी ता गेली होती. या दरम्यान तिने एक अतिशय सुंदर आसामी ड्रेस परिधान केला होता. ज्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 



हिंदू-मुस्लिम करणाऱ्यांना सुनावलं
या फोटोंच्या कमेंटमध्ये, अनेकांनी तिला मुस्लिम असल्यामुळे हिंदू धर्माचा सण साजरा करण्यावर आक्षेप घेतला होता आणि निगेटिव्ह कमेंट करण्यास सुरुवात केली होती. यासोबत काहींनी असभ्य भाषाही वापरलं होतं. त्यानंतर अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करून अशा कमेंटर्सना प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनेत्री म्हणाली की, ती आधी हिंदुस्थानी आहे मग मुस्लिम आहे. म्हणूनच लोकांनी तिला सांगू नये की तिने कोणते सण साजरे करावेत किंवा करू नये. आजकाल अर्शी खान तिच्या कुस्तीच्या व्हिडिओंमुळे सतत चर्चेत असते. यापूर्वी ती 'बिग बॉस 14' मध्ये दिसली होती.