मुंबई : 'इंडियन आयडल 12' चा विजेता पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल सध्या तुफान चर्चेत आहे. पवनदीप आणि अरूणितामध्ये लव्ह कनेक्शन असल्याची चर्चा रंगत आहे. पण पवनदीप आणि अरूणिताने दोघांच्या नात्याचा खुलासा केला. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असा खुलासा त्यांनी केला. आता दोघांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये अरूणिता 'हम दिल दे चुके' चित्रपटातील टायटल सॉन्ग गाताना दिसत आहे. अरूणिताने गोड आवाजात सर्वांचं लक्ष वेधल आहे. अरूणिताला यासाठी साथ मिळाली आहे पवनदीपची. अरूणिता गात आहे तर पवनदीप गिटार वाजवत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



दरम्यान; जेव्हा शोची सुरूवात झाली तेव्हापासून अरूणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र पसरल्या. शो मेकर्सद्वारा त्यांच्या नात्याला लव्ह एँगल देण्यात आला. त्यांच्या एँगलची सोशल मीडिया टीका देखील करण्यात आली. पण शेवटपर्यंत या दोघांच्या जोडीने आणि गोड आवाजाने सर्वंचं लक्ष वेधून घेतलं.  


पार्श्वसंगीतासाठी पवनदीप तयार 
सांगायचं झालं तर पवनदीप 2015 साली 'द व्हॉयस' शोचा विजेता ठरला होता. आता इंडियन आयडलमध्ये येण्याचं  कारण वियजी होणे नव्हतं तर नवं काही तरी शिकण्याची इच्छा होती. आता पवनदीपला पूर्ण विश्वास आहे की तो पार्श्वसंगीतासाठी तयार झाला आहे.